लखनऊ : उत्तर प्रदेशातील बरेली येथे एका न्यायाधीशाचा कुत्रा बेपत्ता झाला. उत्तर प्रदेशातील बरेली येथे एका न्यायाधीशाने शेजारी राहणारा डंपी अहमद आणि १४ जणांविरुद्ध एफआयआर दाखल केली आहे. या एफआयआरमध्ये पीडित न्यायाधीशाच्या मुलींसोबत मारहाण आणि गैरवर्तनाचा आरोप करण्यात आला आहे. न्यायाधीश हे लखनऊला राहतात पण त्यांचे कुटुंबिय बरेलीला राहते.
एका वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, हे प्रकरण बरेलीच्या इज्जत नगरमधील आहे. न्यायाधीशांच्या पत्नीचा आरोप आहे की, १६ मे रोजी डंपी अहमद, त्याची पत्नी आणि त्यांच्यासोबत असलेल्या लोकांनी गैरवर्तन केले. डंपी अहमद आणि त्याच्या साथीदारांनी त्यांना तसेच त्याच्या दोन मुलींना धमकावले. तसेच दि. १८ मे रोजी त्यांचा कुत्रा ही गायब झाला. त्यांच्या कुत्र्याला मारले असावे, अशी भीती न्यायाधीशांच्या कुटुंबीयांनी व्यक्त केली आहे. या प्रकरणी पोलिसांनी प्राण्यांवर क्रूरता प्रतिबंधक कायद्याआधारे गुन्हा दाखल केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दि. १६ मे रोजी संध्याकाळी डंपी अहमदच्या पत्नीने कुत्र्याने आपल्याला चावा घेतल्याची तक्रार केली आणि ती न्यायाधीशांच्या घरी पोहोचली, तेव्हा डंपी अहमदने न्यायाधीशांच्या मुलींशी गैरवर्तन केले. त्याने जवळच्या गावातील आपल्या साथीदारांना बोलवून संपुर्ण कुटुंबाला धमकावले. न्यायाधीशाने व्हॉट्सॲपवर फोन केला असता त्यांना धमकीही दिली. यावेळी पोलिसांना पाचारण करण्यात आले आणि पोलीस येण्यापूर्वीच सर्वांनी पळ काढला.
इज्जत नगर पोलिस ठाण्याचे प्रभारी निरीक्षक जयशंकर सिंह यांनी सांगितले की, न्यायाधीशांच्या पत्नीच्या तक्रारीवरून एका नावासह अनेक अज्ञात लोकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाची चौकशी करण्यात येत आहे. या प्रकरणी डंपी अहमद आणि त्याच्या १४ अज्ञात साथीदारांविरुद्ध प्राणी क्रूरता कायद्याप्राण्यांवर क्रूरता प्रतिबंधक कायदासह अनेक गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.