ब्रेकिंग! पुणे अपघात प्रकरणात बाल हक्क न्यायालयाचा मोठा निर्णय

22 May 2024 21:09:17
pune accident case
 
पुणे :    पुणे अपघात प्रकरणातील आरोपी वेदांत अग्रवाल याचा जामीन रद्द करण्यात आला असून त्याची बाल सुधारगृहात रवानगी करण्यात आली आहे. गुरुवारी बाल हक्क न्यायालयात याप्रकरणाची सुनावणी पार पडली. त्यानंतर न्यायालयाने निर्णय राखून ठेवला होता.
 
शनिवार १८ मे रोजी वेदांत अग्रवाल या आरोपीने मद्यप्राशन करून कार चालवत दोघांना चिरडले. त्यानंतर तो अल्पवयीन असल्याने बाल हक्क न्यायालयाने त्याला जामीन मंजूर केला होता. परंतू, न्यायालयाच्या या निर्णयावर देशभरात संताप व्यक्त करण्यात येत होता.

त्यामुळे पुणे पोलिसांनी आरोपीला सज्ञान समजून त्याला शिक्षा देण्याची मागणी केली होती. बुधवारी जवळपास ८ तास याप्रकरणाची सुनावणी पार पडली. त्यानंतर न्यायालयाने वेदांत अग्रवालचा जामीन रद्द करण्याचा निर्णय दिला आहे. तसेच त्याला बाल सुधारगृहात पाठवण्यात येणार आहे.



Powered By Sangraha 9.0