पुणे अपघातातील आरोपी कुटुंबाची गुन्हेगारी पार्श्वभूमी! छोटा राजनशी संबंध?

22 May 2024 11:56:42
 
Pune accident
 
पुणे : पुणे अपघातातील (Pune Accident) आरोपी असलेल्या अग्रवाल कुटुंबाबात एक मोठी बातमी पुढे आली आहे. अग्रवाल कुटुंबाची गुन्हेगारी पार्श्वभूमी असल्याचे सांगण्यात येत आहे. याशिवाय गँगस्टर छोटा राजनशी त्यांचा संबंध असल्याचाही माहितीही पुढे आली आहे.
 
पुण्यातील बडा व्यावसायिक विशाल अग्रवालचा मुलगा वेदांत अग्रवाल याने मद्यप्राशन करुन गाडी चालवत दोन तरुणांना चिरडले. मात्र, वेदांत अग्रवाल अल्पवयीन असल्याने त्याला लगेच जामीन मंजूर करण्यात आला. त्यामुळे देशभरातून संताप व्यक्त करण्यात येत आहे.
 
दरम्यान, आता अग्रवाल कुटुंबाबत एक महत्वाची बाब पुढे आली आहे. अग्रवाल कुटुंबाची गुन्हेगारी पार्श्वभूमी समोर आली आहे. विशाल अग्रवाल यांचे वडील सुरेंद्रकुमार अग्रवाल यांनी भावासोबतच्या मालमत्ता वादात गँगस्टर छोटा राजन याच्याशी हातमिळवणी केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे.
 
तसेच यापूर्वी त्यांनी एका व्यक्तीच्या हत्येचा प्रयत्न केल्याचेही सांगण्यात येत आहे. याप्रकरणी आरोपी वेदांतचे वडील विशाल अग्रवाल यांना अटक करण्यात आली आहे. बुधवारी पुण्यातील बालहक्क न्यायालयात याप्रकरणाची सुनावणी पार पडणार आहे.
 
 
 
 
Powered By Sangraha 9.0