'चंदू चॅम्पियन'मध्ये कार्तिक सोबत झळकणार हेमांगी कवी, साकारणार महत्वपुर्ण भूमिका

21 May 2024 13:57:38
 
hemangi kavi
 
 
मुंबई : भारताच्या इतिहासात अनेक अनसीन हिरो आहेत. त्यापैकी एक म्हणजे मुरलीकांत पेटकर. अभिनेता कार्तिक आर्यनचा आगामी चंदु चॅम्पियन हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात भारताचे पहिले पॅराऑलम्पिक विजेता मुरलीकांत पेटकर यांचा जीवनपट उलगडला जाणार आहे. विशेष म्हणजे या चित्रपटात दोन मराठमोळे कलाकार झळकणार आहेत. त्यापैकी एक म्हणजे अभिनेता आरोह वेलणकर आणि दुसरी अभिनेत्री हेमांगी कवी.
 

hemangi kavi 
 
चंदु चॅम्पियन या चित्रपटाबद्दल विशेष पोस्ट हेमांगीने सोशल मीडियावर शेअर करत तिने चंदु चॅम्पियन चित्रपटाच्या ट्रेलरला प्रेक्षकांचा जो प्रतिसाद मिळाला त्यासाठी सगळ्यांचे आभार मानले आहेत. हेमांगीने 'चंदू चॅम्पियन' मध्ये मुरलीकांत पेटकर यांच्या आईची भूमिका साकारली आहे. 'चंदु चॅम्पियन' या चित्रपटाचे दिग्दर्शन कबीर खान यांनी केले आहे. आणि हा चित्रपट १४ जून २०२४ रोजी प्रदर्शित होणार आहे.
 
 
 
Powered By Sangraha 9.0