'मुंज्या'! मराठी दिग्दर्शकाचा हिंदी हॉरर चित्रपट लवकरच येणार भेटीला

21 May 2024 15:16:08

munjya  
 
 
मुंबई : भयपट म्हणजेच हॉरर चित्रपट भल्याभल्यांची झोप उडवतो. असाच एक नवा कोरा भयपट मुंज्या प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून या हिंदी हॉरर चित्रपटाचे दिग्दर्शन आदित्य सरपोतदार यांनी केले आहे. नुकताच या चित्रपटाचा टीझर भेटीला आला असून चित्रपटाबद्दलची अधिक उत्सुकता वाढत चालली आहे.
 
'मुंज्या' या हॉरर चित्रपटाच्या टीझरच्या सुरुवातीला जंगलातील एक पिंपळाचं झाड दाखवले आहे. या झाडातून मुंज्या नावाची एक विकृत आकृती बाहेर येते. 'मुन्नी बदनाम हुई' हे मलायका अरोराचं गाणं ऐकताच मुंज्या बाहेर येत असल्याचं टीझरमध्ये दिसत आहे. आता मुन्नीसाठी हा मुंज्या का वेडा झाला आहे? त्यांचं कनेक्शन काय आहे हे चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतरच समजेल.
 
'मुंज्या' सिनेमाच्या टीझरमुळे प्रेक्षकांची सिनेमासाठीची उत्सुकता वाढली आहे. 'स्त्री' या चित्रपटाचे मेकर्स मॅडॉक फिल्म्सकडून ‘मुंज्या’ची निर्मिती करण्यात आली आहे. आणि 'झोंबिवली' या मराठी चित्रपटानंतर आदित्य सरपोतदार पुन्हा मुंज्या चित्रपट घेऊन येत आहेत. यात मोना सिंग, अभय वर्मा, शर्वरी अशी कलाकार मंडळी झळकणार आहेत. आणि ७ जूनला 'मुंज्या' चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.
 
 
 
Powered By Sangraha 9.0