मुंबई: आज सकाळी इक्विटी बेंचमार्क निर्देशांकात घट झाली आहे. सकाळी ११ वाजेपर्यंत बीएसईत १०९.५१ अंशाने घट होत ७३९०७.१४ पातळीवर गेला आहे तर एनएसई निफ्टी निर्देशांक २९.६० अंशाने घसरत २२४७२.४० पातळीवर पोहोचला आहे. आज सकाळच्या सत्रात दोन्ही बँक निर्देशांकातही घट झाली आहे. बीएसई बँक निर्देशांक १०२.३१ अंशाने घटत ५४९६०.८५ पातळीवर गेला आहे तर एनएसईत निफ्टी बँक निर्देशांक ८७.५५ अंशाने घसरण होत ४८११.९५ पातळीवर पोहोचला आहे.
बीएसई मिडकॅप ०.०३% वाढ झाली असून स्मॉलकॅपमध्ये ०.२८ टक्क्यांनी घसरण झाली आहे. एनएसईत मिडकॅपमध्ये ०.०४ टक्क्यांनी व स्मॉलकॅपमध्ये ०.४६ टक्क्यांनी घसरण झाली आहे. निफ्टी क्षेत्रीय निर्देशांकात (Sectoral Indices) सर्वाधिक वाढ मेटल (२.१८%), पीएसयु बँक (०.९५%), मिडिया (०.८८%) समभागात वाढ झाली आहे तर सर्वाधिक नुकसान एफएमसीजी (०.६३%), आयटी (०.३५%), प्रायव्हेट बँक (०.४६%) समभागात झाले आहे.
बाजारातील चढ्या ट्रेंडनंतर निकालांच्या पार्श्वभूमीवर बाजार पुन्हा खाली गेला आहे. मुख्यतः हेवी वेट निर्देशांकात घसरण झाल्यानंतर मिडकॅप व स्मॉलकॅपमध्ये तुलनेने घसरण झाल्याने बाजारात खालच्या बाजूला झुकला आहे.तसेच बाजारातील नवीन आलेल्या कंपनींच्या तिमाही निकालांचा परिणाम अखेरच्या सत्रात काय होतो हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. सकाळी विशेषतः गिफ्ट निफ्टीत ४० अंशाने घसरण झाल्यानंतर आज बाजारात घसरणीचे संकेत मिळाले होते.
सकाळी बीएसईत जेएसडब्लू स्टील, टाटा स्टील, पॉवर ग्रीड, एसबीआय, एशियन पेंटस, एनटीपीसी,टेक महिंद्रा, मारूती सुझुकी, टाटा मोटर्स, बजाज फायनान्स, कोटक महिंद्रा, टायटन कंपनी या समभागात फायदा झाला आहे तर नेस्ले, टीसीएस, एचसीएलटेक, एचयुएल, इन्फोसिस, आयसीआयसीआय बँक, एम अँड एम, अल्ट्राटेक सिमेंट, इंडसइंड बँक, लार्सन,आयटीसी, बजाज फिनसर्व्ह, रिलायन्स, विप्रो, एचडीएफसी बँक, बजाज फायनान्स, सनफार्मा या समभागात घसरण झाली आहे.
एनएसईत कोल इंडिया, हिंदाल्को, जेएसडब्लू स्टील, अदानी पोर्टस, बीपीसीएल, पॉवर ग्रीड, एशियन पेंटस, डिवीज , सिप्ला, एनटीपीसी, अदानी एंटरप्राईज, ओएनजीसी, टेक महिंद्रा, मारूती सुझुकी, अपोलो हॉस्पिटल, भारती एअरटेल, ब्रिटानिया, ग्रासीम या समभागात फायदा झाला आहे तर नेस्ले, एचडीएफसी लाईफ, एसबीआय लाईफ इन्शुरन्स, टीसीएस, एचयुएल,हिरो मोटोकॉर्प आयसीआयसीआय बँक, इन्फोसिस, डॉ रेड्डीज, आयटीसी, इंडसइंड बँक, लार्सन, बजाज फिनसर्व्ह, एम अँड एम, एक्सिस बँक, रिलायन्स, एचडीएफसी बँक, विप्रो, सनफार्मा, बजाज ऑटो, टाटा कनज्यूमर प्रोडक्ट, सनफार्मा या समभागात घसरण झाली आहे.