Q4 Results: सरकारी नवरत्न कंपनी बेलमजबूत स्थितीत १३८२.०२ कोटींचा निव्वळ नफा

21 May 2024 12:43:21

bhel
 
 
मुंबई: सरकारी कंपनी भारत इलेक्ट्रोनिक्स लिमिटेडला ३१ मार्चपर्यंतच्या तिमाहीत ३० टक्क्यांचा निव्वळ नफा झाला आहे. कंपनीला तिमाहीत एकूण १७९७.११ कोटींचा निव्वळ नफा झाला आहे. मागील आर्थिक वर्षातील तिमाहीत कंपनीला १३८२.०२ कोटींचा निव्वळ नफा झाला होता.
 
कंपनीला कामकाजातून मिळणाऱ्या महसूलात (Revenue From Operations) मध्ये ३२ टक्क्यांनी वाढ होत ८५६४.०८ कोटी प्राप्त झाले आहेत. मागील वर्षाच्या तिमाहीत कंपनीला ६४७९.१२ कोटी रुपये मिळाले होते. संपूर्ण वर्षात कंपनीच्या उलाढालीत १४.३५ टक्क्यांनी वाढ झाली आहे. मागील वर्षाच्या तिमाहीत कंपनीची उलाढाल (Turnover) १७३३३.३७ कोटींवरून वाढत यावर्षी १९८१९.९३ कोटींवर पोहोचली आहे.
 
फेब्रुवारी महिन्यात संरक्षण मंत्रालयाने कंपनीला २२६९ कोटींची ऑर्डर दिली होती ज्यामध्ये ११ शक्ती वॉरफेअर सिस्टीमचा समावेश होता. १ एप्रिल २०२४ मध्ये कंपनीला ७५९३४ कोटींपर्यंत ऑर्डर मिळाल्या होत्या. कंपनीला करोत्तर नफा (Profit After Tax) ३९८४.५२ कोटी रुपये होता. आर्थिक वर्ष २०२३ मध्ये कंपनीला २९८४.४२ कोटींचा निव्वळ नफा झाला होता जो यावर्षी ३३.५ टक्क्यांपर्यंत वाढला आहे.
 
बेल कंपनीच्या संचालक मंडळाने ०.८० रुपये लाभांश (Dividend) प्रति समभाग सूचवला आहे. याबाबत अंतिम निर्णय भागभांडवलधारकांच्या आगामी सर्वसाधारण बैठकीत होण्याची शक्यता आहे.
 
Powered By Sangraha 9.0