४ जी, ५ जी दर्जेदार सुविधा न पुरवल्यास ट्राय देणार कंपन्यांना दट्ट्या!

21 May 2024 18:34:41

TRAI
 
 
 
मुंबई: आता ५ जी सेवा देणाऱ्या कंपन्यांना ट्राय (Telecom Regulatory Authority of India) ने नवा दट्ट्या देण्याचे ठरवले आहे. तशी बातमी प्रसारमाध्यमांनी प्रसिद्ध केली आहे ज्यामध्ये म्हटले आहे की गेल्या काही दिवसात ५ जी ग्राहकांच्या सेवेत खराबी निरिक्षणास आली आहे. ज्यामध्ये कॉल ड्रॉप, खराब कॉलिंग दर्जा, ५ जी कनेक्टिव्हिटीत खराब दर्जा अशा विविध तक्रारींची दखल घेत ट्रायने सेवा पुरवत असलेल्या कंपन्यावर कडक नियम लागू करण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
 
४ जी व ५ जी दर्जात्मक सेवा पुरवण्यासाठी ट्रायने काही निर्णय घेण्याचे ठरवले असून येणाऱ्या दोन महिन्यांत याविषयी अंतिम चर्चा होऊन नवीन कायदे येण्याची शक्यता आहे. ५ जी सेवेत दोन महिन्यांत हे कायदे येणार असताना ४ जी सेवेची दखल घेतली गेली आहे. यामध्ये ४ जी सेवेचा दर्जा तपासला जाऊ शकतो. कारण दिवसेंदिवस ५ जी सेवा घेत असलेल्या ग्राहकांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे.
 
दिलेल्या आकडेवारीनुसार, ५ जी सेवा घेतलेल्या ग्राहकांची संख्या १८ महिन्यात २०० दशलक्ष ग्राहकांवर पोहोचली आहे. ५ जी सेवा आली असली तरी त्यांच्यावर कुठलेही मानकांचे (Standards) निर्बंध नाहीत अथवा नियम नाहीत. त्यामुळे ग्राहकांना दर्जेदार सुविधा मिळण्यासाठी यावर काही फ्रेमवर्क सरकार आणू शकते. याविषयी बोलताना एका अधिकाऱ्याने,'आम्ही व्हॉइस कॉलशी संबंधित समस्या जसे की कॉल ड्रॉप, कॉलमध्ये अंतर,अस्पष्ट आवाज यातील समस्यांसाठी आम्ही काही मानके पाहत आहोत' असे म्हटले आहे.
 
याशिवाय त्यांनी म्हटल्याप्रमाणे,'पॅकेट ड्रॉपिंगमध्ये काही समस्या आहेत ज्या सोडवण्याची गरज आहे. पॅकेट ड्रॉपिंग म्हणजे एका स्थळावरून दुसऱ्या स्थळावर डेटा वाहताना स्मॉल डेटा युनिटमध्ये खराबी येते. त्यामुळे यामध्ये क्वालिटी चेकिंग होण्याची शक्यता असल्याचे म्हटले आहे. प्रथमच, ट्राय त्याच्या पॅरामीटरचा भाग म्हणून जिटर सादर करेल, ज्याद्वारे ते डेटा प्रवाहातील चढउतारांवर लक्ष ठेवेल.
 
यासाठी ट्रायच्या मते ही मानके व्हिडिओ कॉलिंग, व्हिडिओ प्रसारण, हाय जिटर यासाठी आवश्यक असतात. त्यासाठीच मसुद्याच्या नियमांनुसार, ट्रायने एका महिन्याच्या कालावधीत सरासरी ४ जी आणि ५ जी नेटवर्कमध्ये १०० मिलीसेकंदपेक्षा कमी लेटन्सी सुरू करणे अपेक्षित आहे.
 
Powered By Sangraha 9.0