घरबसल्या पाहता येणार ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ चित्रपट; कुठे? जाणून घ्या....

20 May 2024 17:15:13
Swatantryveer Savarkar 
 
 
मुंबई : रणदीप हुड्डा दिग्दर्शित 'स्वातंत्र्यवीर सावरकर' या चित्रपटाला प्रेक्षकांनी उदंड प्रतिसाद दिला. देशभरात २२ मार्च रोजी प्रदर्शित झालेला हा चित्रपट मराठी भाषेतही प्रदर्शित झाला होता. आता हा चित्रपट प्रेक्षकांना घरबसल्या पाहता येणार आहे. लवकरच हा चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित होणार असून नव्या पिढीला स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा इतिहास जाणून घेण्याची ही मोठी संधी आहे.
 
स्वातंत्र्यवीर सावरकर हा चित्रपट येत्या २८ मे रोजी ZEE5 या ओटीटी वाहिनीवर प्रदर्शित होणार आहे. ZEE5 ने त्यांच्या सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत ही माहिती दिली आहे. चित्रपटाच्या ओटीटी रिलीजबद्दल माहिती देताना ZEE5 ने पोस्टमध्ये लिहिलं आहे, “अखंड भारत हे त्यांचं स्वप्न होतं, हिंदुत्व त्याचा पाया होता. सावरकरांच्या १४१ व्या जयंतीनिमित्त हा चित्रपट २८ मे रोजी #ZEE5 वर प्रदर्शित केला जाईल”.
 

Swatantryveer Savarkar 
 
स्वातंत्र्यवीर सावरकर या चरित्रपटात लोकमान्य टिळक, महात्मा गांधी, मोहम्मद अली जिन्ना, जवाहरलाल नेहरू, सुभाषचंद्र बॉस, भिकाजी कामा, मदनलाल धिंगरा, भगत सिंह इत्यादि क्रांतिकराकांच्या भूमिकाही चित्रपटात पाहायला मिळणार आहेत.
 
 
 
Powered By Sangraha 9.0