पंतप्रधान नरेंद्र मोदी देशासाठी करत असलेले कार्य अभिमानास्पद आहे – ईशा देओल

20 May 2024 12:01:33

modi  
 
 
मुंबई : लोकसभा निवडणूकच्या पाचव्या टप्प्यातील मतदान आज (२० मे २०२४) रोजी होत आहे. सामान्य नागरिकांसोबत कलाकार देखील आपला मतदानाचा मुलभूत अधिकार बजावत आहेत. ८८ वर्षीय अभिनेते धर्मेंद्र यांनी देखील मतदान केले असून यावेळी त्यांच्यासोबत अभिनेत्री हेमा मालिनी आणि ईशा देओल देखील होत्या. मतदान केल्यानंतर ईशा यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कामाचे कौतुक केले.
 
ईशा देओल हिने मतदान केल्यानंतर माध्यमांशी संवाद साधताना म्हटले की, "नागरिकांनी घरातून बाहेर पडा आणि मत द्या. कारण आज मतदानाच्या दिवशी जर का तुम्ही मत दिलं नाही तर भविष्यात चांगलं वाईट काही झालं तर त्याबद्दल बोलण्याचा तुम्हाला अधिकार नाही. शिवाय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या भारत देशासाठी जे काही कार्य केले आहे आणि करत आहे ते आपण सगळे पाहात आहोत. आपल्या भविष्यातील नागरिकांसाठी, पिढीसाठी त्यांचा जो दृष्टीकोन आहे तो उत्तम आहे. मोदी आपला देश आंतरराष्ट्रीय स्तरावर देखील वाढवत आहेत याचाही अभिमान आहे".
 
 
 
तर, अभिनेत्री हेमा मालिनी यांनी देखील मतदान केल्यानंतर प्रतिक्रिया देताना म्हटले की, यावेळी ४०० पार चा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेला नारा सफल होणार असे त्यांनी म्हटले आहे.
 
 
Powered By Sangraha 9.0