मुंबई: घसरत्या बाजारानंतर युटर्न घेत बाजारात मोठी रॅली झाल्याने महत्वाच्या ब्लू चिप्स कंपन्यांच्या समभागात मोठी वाढ मिळाली होती. त्यामुळे या कंपन्यांच्या बाजार भांडवलात (Market Capitalisation ) मध्ये मोठी वाढ झाली आहे. सर्वांत मोठ्या बाजार भांडवल कंपन्यांमध्ये ८ कंपन्याचे बाजार भांडवल १४७९३५.१९ कोटी झाले आहे.सर्वाधिक वाढ एलआयसी व रिलायन्स इंडस्ट्रीज या कंपन्यांमध्ये झाले आहे. मागच्या आठवड्यात इक्विटी बेंचमार्क निर्देशांकात १.८४ टक्क्यांनी वाढ झाली होती.
बीएसई व एनएसईने बाजार रिकव्हरीकरिता विशेष ट्रेडिंग सेशन घेतले होते. यामध्ये एलआयसी समभागात वाढ झाल्याने कंपनीच्या मूल्यांकनात ४०१६३.७३ कोटींवरुन वाढ होत ६१६२१२.९० कोटींवर वाढ झाली आहे. याशिवाय भारती एअरटेल कंपनीच्या मूल्यांकनात २६४९२.६१ वरून वाढ होत ७६४९१७.२९ कोटींवर वाढ झाली आहे. आयसीआयसीआय बँकेचे बाजार भांडवल ९५८०.६८ कोटींवरून वाढत ७९४४०४.५१ कोटींवर गेले आहे.
आयटीसी कंपनीच्या मूल्यांकनात ४०५७.५४ कोटींवरून ५४४८९५.६७ कोटीवर वाढले आहे. स्टेट बँक ऑफ इंडियाचे मूल्यांकन २२३१.१५ कोटींवरून वाढत ७३२५७६.७७ कोटीवर पोहोचले आहे.
सर्वाधिक वाढ रिलायन्स इंडस्ट्रीज मध्ये होत त्यानंतर टीसीएस, एचडीएफसी बँक, आयसीआयसीआय बँक,भारती एअरटेल, एलआयसी, इन्फोसिस, हिंदुस्थान युनिलिव्हर व आयटीसी या कंपन्यांच्या बाजार भांडवलात झाली आहे.