मुंबई: आज आंतरराष्ट्रीय स्तरावर डॉलरची किंमत वधारल्याने बाजारात सोने चांदी किंमतीत मोठी वाढ झाली आहे. युएस गोल्ड स्पॉट दरात ०.९३ टक्यांने वाढ झाली आहे तर युएस गोल्ड फ्युचर निर्देशांकात ०.९७ ते १ टक्क्यांनी वाढ झाली आहे. भारतातील एमसीएक्स (MCX) निर्देशांकात सोने ०.०५ टक्क्यांनी महागले असून एमसीएक्सवरील सोन्याचे दर ७३७५० रुपयांवर पोहोचले आहेत.
'गुड रिटर्न्स' संकेतस्थळावरील माहितीनुसार, भारतातील सोन्याच्या दरात प्रति ग्रॅम ५० रुपयांनी वाढ झाली आहे. भारतातील २२ कॅरेट सोन्याच्या दरात प्रति १० ग्रॅम ५०० रुपयांनी वाढ झाली आहे तर २४ कॅरेट सोन्याच्या दरात प्रति १० ग्रॅम ५४० रुपयांनी वाढ झाली आहे. १८ कॅरेट सोन्याच्या दरात प्रति १० ग्रॅम ४१० रुपयांनी वाढ झाली आहे.
मुंबईतील २२ कॅरेट सोन्याच्या दरात प्रति १० ग्रॅम ५०० रूपयांनी वाढ झाली आहे तर २४ कॅरेट सोन्याच्या प्रति १० ग्रॅम दरात ५४० रुपयांनी वाढ झाली आहे.
चांदीत जबरदस्त वाढ -
आंतरराष्ट्रीय स्तरावरील सोने महागली असतानाच चांदीही महागली आहे. चांदीच्या प्रति किलो दरात तब्बल ३५०० रुपयांनी वाढ झाली आहे. १ किलो चांदीचे दर ९६५०० रुपयांवर पोहोचले आहे. मुंबईतील चांदीच्या दरात प्रति किलो ३५०० रुपयांनी वाढ होत प्रति किलो चांदी ९६५०० रुपयांनी महागली आहे. काल सोन्याची किंमत प्रति १ किलो ९३००० रुपये होती. एमसीएक्सवर चांदीच्या निर्देशांकात ०.१४ टक्क्यांनी वाढ होत ९११४९.०० पातळीवर चांदी पोहोचली आहे.
डॉलरच्या पातळीत वाढ झाल्याने व जागतिक स्तरावर पुरवठ्यापेक्षा मागणीत वाढ झाल्याने ही भाववाढ झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे.