उदय बोरवणकर पश्चिम रेल्वेचे प्रमुख यांत्रिक अभियंता

दि. २ मे रोजी बोरवणकर यांनी पदाचा कार्यभार स्वीकारला

    02-May-2024
Total Views |

railway


मुंबई, दि.२:  
पश्चिम रेल्वेच्या प्रधान मुख्य यांत्रिक अभियंता पदी उदय बोरवणकर यांनी नियुक्ती करण्यात अली आहे. बुधवार, दि. २ मे रोजी बोरवणकर यांनी पदाचा कार्यभार स्वीकारला आहे. ते इंडियन रेल्वे सर्व्हिस ऑफ मेकॅनिकल इंजिनिअर्स (IRSME) च्या १९८८च्या तुकडीचे वरिष्ठ अधिकारी आहेत. तीन दशकांहून अधिक काळात त्यानी आपल्या शानदार कारकिर्दीत मध्य रेल्वे, पश्चिम रेल्वे, दक्षिण पूर्व रेल्वे, पश्चिम मध्य रेल्वे, आरडीएसओ, रेल्वे बोर्ड, खाण मंत्रालय आणि महामेट्रोमध्ये प्रतिनियुक्तीवर विविध आव्हानात्मक पदावर काम केले आहे.

उदय बोरवणकर यांना रोलिंग स्टॉकचे उत्पादन, संचालन आणि देखभाल आणि मोठ्या विभागातील सर्व क्रियाकलापांचे व्यवस्थापन या क्षेत्रातील समृद्ध अनुभव आहे. अतिरिक्त विभागीय रेल्वे व्यवस्थापक (नागपूर विभाग) आणि विभागीय रेल्वे व्यवस्थापक (भोपाळ विभाग) म्हणून काम केले आहे. आयआयएम/अहमदाबाद, आयएसबी/हैदराबाद, बोकोनी स्कूल ऑफ मॅनेजमेंट/इटली आणि ग्राझ (ऑस्ट्रिया) येथील विज्ञान विद्यापीठ यांसारख्या नामांकित संस्थांमध्ये त्यांनी प्रशिक्षण दिले आहे. बोरवणकर यांना पर्यावरण व्यवस्थापन, गुणवत्ता नियंत्रण आणि कौशल्य विकास या क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीचे श्रेय जाते.