टीवीएस मोटर्सच्या विक्रीत भरघोस वाढ ' इतक्या ' टक्क्यांनी युनिट्सची विक्री

02 May 2024 12:02:55

tvs motor
 
 
मुंबई: टीवीएस मोटर्स कंपनीच्या दुचाकी विक्रीत एप्रिलपर्यंत २५ टक्क्यांनी वाढ झाली आहे. इयर ऑन इयर बेसिसवर
ही वाढ झाली. एकूण कंपनीच्या ३८३६१५ युनिट्सची विक्री झाली आहे. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, मागील वर्षाच्या तुलनेत ही वाढ २५ टक्क्यांनी झाली आहे. मागील वर्षी एप्रिल २०२३ मध्ये कंपनीच्या दुचाकी विक्रीत २९४७८६ पर्यंत वाढ झाली होती जी २७ टक्क्यांनी वाढत ३७४५९२ पर्यंत वाढली आहे. देशांतर्गत दुचाकी विक्रीत २९ टक्क्यांनी वाढ होत मागील वर्षाच्या २३२९५६ तुलनेत या एप्रिल २०२४ मध्ये ३०१४४९ पर्यंत वाढ झाली आहे.
 
एप्रिल २०२३ मधील १५२३६५ विक्रीच्या तुलनेत एप्रिल २०२४ मध्ये १८८११० पर्यंत वाढ झाली आहे. इयर ऑन इयर बेसिसवर ही वाढ २४ टक्क्यांनी झाली आहे. स्कूटर विक्रीत देखील ३४ टक्क्यांनी वाढ झाली आहे. ही विक्री एप्रिल २०२३ मधील १०७४९६ तुलनेत १४४१२६ पर्यंत एप्रिल २०२४ मध्ये वाढ झाली आहे. तीनचाकी विक्रीत मात्र घट झाली आहे. एप्रिल २०२३ मधील ११४३८ युनिटपेक्षा घटत एप्रिल २२०४ पर्यंत ९०२३ युनिट एवढी विक्री झाली आहे.
 
कंपनींच्या इलेक्ट्रिक वाहन व्यवसायात देखील वाढ झाली आहे. मागील वर्षाच्या एप्रिलच्या ६२२७ युनिट्स वरून वाढ होत एप्रिल २०२४ पर्यंत १७४०३ युनिट्सपर्यंत वाढ झाली आहे. याविषयी बोलताना कंपनीने म्हटले आहे की, नवीन इलेक्ट्रिक मोबिलिटी प्रमोशन स्कीम (EMPS) 2024 FAME II मार्च २०२४ मध्ये संपल्यानंतर एप्रिल २०२४ पासून लागू झाली. एक सुरळीत संक्रमण सुनिश्चित करून, TVS मोटरने एप्रिल २०२४ मध्ये १७४०३ युनिट्सची इलेक्ट्रिक वाहन विक्री नोंदवली, जी सतत मजबूत मागणी दर्शवते," कंपनीने एका निवेदनात म्हटले आहे.
 
परदेशात केलेल्या विक्रीवर, TVS मोटरने सांगितले की, तिची एकूण निर्यात 12 टक्क्यांनी वाढून या वर्षी एप्रिलमध्ये ८०५०८ युनिट्स झाली आहे, जी गेल्या वर्षी याच महिन्यात 71,663 युनिट्सची झाली होती. एप्रिल २०२४ मध्ये टू-व्हीलरची निर्यात १८ टक्क्यांनी वाढून ७३१४३ युनिट्सवर पोहोचली, जी एप्रिल २०२३ मध्ये ६१८३० युनिट्स होती.
 
Powered By Sangraha 9.0