फेडरल व्याजदर स्थिर राहिल्यावर सोने चांदीत भाववाढ सोने ७२२७० तोळा चांदी ८१२६०.०० किलो

02 May 2024 12:39:10

Gold
 
 
मुंबई: अमेरिकन युएस फेडरल रिझर्व्ह व्याजदरात कुठलाही कपात झाली नसल्याने बाजारात काही प्रमाणात विश्वासाचे वातावरण निर्माण झाले आहे. जागतिक पातळीवरील मिश्र संकेत असताना व्याजदरात वाढ न झाल्यामुळे सोन्याच्या दरात वाढ झाली आहे.जून पर्यंत व्याज दर कपात पुढे ढकलल्याने तारण कर्ज दर नियंत्रणात राहण्याची शक्यता आहे. तुलनेने कर्ज व्याजदर स्वस्त राहिल्याने गुंतवणूकदारांमध्ये सकारात्मकतेचे चित्र पहायला मिळत आहे. अखेर जागतिक पातळीवरील सोन्याच्या दरात वाढ झाली आहे.
 
सकाळी १२.३० पर्यंत सोन्याच्या युएस फ्युचर निर्देशांकात ०.४८ टक्क्यांनी वाढ होत २३२२.५५ रुपयांवर सोने पोहोचले होते.
 
भारतातील एमसीएक्स (Multi Commodity Exchange) सोन्याच्या निर्देशांकात ०.४० टक्क्यांनी वाढ झाली आहे. परिणामी एमसीएक्सवर सोन्याचे दर ७१००९.०० वर पोहोचले आहेत.
 
भारतातील सराफा बाजारात सोन्याच्या किंमतीत सरासरी प्रति ग्रॅम ७० रुपयांनी वाढ झाली आहे. सोन्याचे प्रति ग्रॅम दर साधारणपणे ६६२५ रुपयांवर पोहोचले आहे. भारतातील सराफा बाजारात २२ कॅरेट सोन्याच्या किंमतीत प्रति १० ग्रॅम (१ तोळा) ७०० रुपयांनी वाढ झाली असल्याने सोने दर ६६२५० रुपयांवर गेले आहेत. २४ कॅरेट सोन्याच्या दरात प्रति १० ग्रॅम ७६० रुपयांनी वाढ झाल्याने सोने दर ७२२७० रुपयांवर गेले आहेत.१८ कॅरेट सोन्याच्या दरात प्रति १० ग्रॅम ५८० रुपयांने वाढ झाली आहे.मुंबईत २२ कॅरेट सोन्याच्या दरात प्रति १० ग्रॅम ७०० रुपयांनी वाढ झाली आहे. २४ कॅरेट सोन्याच्या दरात प्रति १० ग्रॅम ७६० रुपयांनी वाढ झाली आहे.
 
चांदीही महागली -
 
भारतातील चांदीच्या किंमतीतही वाढ झाली आहे. भारतातील एमसीएक्स चांदी निर्देशांकात ०.०४ टक्क्यांनी वाढ होत १ किलो चांदी ८१२६०.०० रुपयांवर पोहोचली आहे. मुंबईत चांदीचे दर प्रति १ किलो ५०० रुपयांनी वाढत ८३५०० रुपयांवर पोहोचले आहेत.
 
Powered By Sangraha 9.0