राज्यात उद्या अंतिम टप्पातील मतदान! दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला

    19-May-2024
Total Views |
 
Voters
 
मुंबई : लोकसभा निवडणूकीच्या अंतिम टप्प्यातील मतदान उद्या पार पडणार असून अनेक दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. दरम्यान, मतदान केंद्रांमध्ये आजपासूनच निवडणूकीची तयारी सुरु झाली आहे. सर्व मतदान केंद्रांवर ईव्हीएम मशीन पाठवण्यात आल्या आहेत.
 
सोमवार, १९ मे रोजी राज्यात पाचव्या आणि अंतिम टप्प्यातील मतदान होणार आहे. यावेळी धुळे, नाशिक, कल्याण, भिवंडी, पालघर आणि मुंबईतील सहा मतदारसंघांमध्ये निवडणूका होणार आहेत. दरम्यान, या पार्श्वभूमीवर सर्वच मतदारसंघांमध्ये जय्यत तयारी सुरु आहे.
 
 
बहुतांश मतदारसंघांमध्ये महायूती विरुद्ध महाविकास आघाडी असा सामना रंगणार आहे. तर अनेक ठिकाणी तिरंगी लढत होणार आहे. शनिवारी सायंकाळी अंतिम टप्प्यातील प्रचाराच्या तोफा थंडावल्या आणि आजपासून निवडणूकीची तयारी सुरु झाली आहे. दरम्यान, सोमवारी या सर्व मतदारसंघातील मतदारांचं भवितव्य मतपेटीत बंद होणार आहे.