नवीन सरकार आल्यानंतर आणखी काही क्षेत्रात थेट परदेशी गुंतवणूकीला मान्यता देणार?

सरकारमधील सेक्रेटरी राजेश कुमार सिंह यांचे सुतोवाच

    18-May-2024
Total Views |

Rajesh Singh
 
 
 
मुंबई: गेल्या वर्षी सरकारने अंतराळ क्षेत्रातील थेट परदेशी गुंतवणूकीला (FDI) ला हिरवा कंदील दाखवला होता. या क्षेत्रात संपूर्ण परदेशी गुंतवणूकीला मान्यता दिल्यानंतर आता नवीन मोठी बातमी आली आहे. एका कार्यक्रमात बोलताना, Secretary of Department for Promotion of Industry and Internal Trade (डीपीआयआयटी) राजेश कुमार सिंह यांनी 'आगामी काळात नवीन सरकार आल्यानंतर नव्या काही क्षेत्रात परदेशी गुंतवणूकीला मान्यता मिळू शकते ' हे मोठे विधान त्यांनी केले आहे.
 
'गेल्या काही वर्षांत भारताने काही क्षेत्रात लिबरल इकॉनॉमीचा विचार करत परदेशी गुंतवणूक धोरण मान्य केले होते. इतर काही देशांपेक्षा विशेषत दक्षिण पूर्व देशांपेक्षाही भारताने परदेशी गुंतवणूकीला चालना देण्याचे धोरण अवलंबिले आहे ' असे उद्गार सिंह यांनी यावेळी काढले .
 
आगामी काळात आम्ही काही नवीन क्षेत्र एफडीआयसाठी खुली करणार आहोत व त्यासंबंधी विचार चालू आहे आगामी काळात सरकार स्थापन झाल्यानंतर या कार्याला वेग येऊ शकतो अशी पुष्टी सिंह यांनी दिली आहे. याआधी शासनाने अंतराळ क्षेत्रात १०० टक्के एफडीआयला मान्यता दिली होती.