अखेर २५ दिवसांनी बेपत्ता असलेला 'सोढी' घरी परतला

    18-May-2024
Total Views |

sodhi  
 
 
मुंबई : 'तारक मेहता का उल्टा चष्मा' फेम अभिनेता गुरुचरण सिंग (Gurucharan Singh) अर्थात सोढी अचानक बेपत्ता झाला होता. दिल्ली विमानतळाबाहेरुन गुरुचरण २२ एप्रिलपासून बेपत्ता होता. त्याच्याशी काहीच संपर्क न झाल्यामुळे त्याच्या वडिलांनी पोलिसांकडे त्याच्या बेपत्ता होण्याची तक्रार केली होती. मात्र, तब्बल २५ दिवसांनी स्वत:हूनच घरी सुखरुप परतला आहे. आता हा पोलिसांचा शोध संपला असून १७ मे २०२४ रोजी सोढी घरी आला असून तो इतके दिवस घर-संसारापासून दुर तीर्थयात्रेला गेला होता.
 
पोलिसांनी गुरुचरण सिंग यांची चौकशी केल्यानंतर त्यांनीच दिलेल्या माहितीनुसार गुरुचरण सिंग तब्बल २५ दिवसानंतर घरी परतला असून ते तीर्थयात्रेला गेले होते. संसारचा त्याग करुन ते घराबाहेर पडले होते. त्यामुळे अमृतसर, लुधियाना अशा वेगवेगळ्या ठिकाणी ते फिरत विविध शहरांमधील गुरुद्वारांमध्ये ते मुक्काम करत होते.
 
 
 
‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ फेम अभिनेता गुरुचरण सिंग २२ एप्रिलपासून बेपत्ता होते. ते घरातून दिल्ली विमानतळावर जाण्यासाठी निघाले होते, पण ते विमानतळावर पोहोचलेच नाही. गुरुचरण यांची मैत्रीण भक्ती सोनी त्यांना मुंबई विमानतळावर घ्यायला गेली होती, पण ते तिथे आलेच नाही हे समजल्यामुळे त्यांचा तपास घेण्यास सुरुवात झाली.