मालीवाल मारहाण प्रकरणाचा आरोपी विभव कुमार अटकेत

18 May 2024 18:22:12
Swati Maliwal assault case

नवी दिल्ली:
आम आदमी पक्षाच्या (आप) राज्यसभा खासदार स्वाती मालीवाल मारहाण प्रकरणाचा आरोपी आणि मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचा स्वीय सहायक विभव कुमार यास शनिवारी अटक करण्यात आली.दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आपचे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल यांच्या निवासस्थानी त्यांच्याच पक्षाच्या महिला खासदार स्वाती मालीवाल मारहाण करण्यात आली आहे. ही मारहाण केजरीवाल यांचे स्वीय सहायक विभव कुमार याने केल्याचा आरोप मालीवाल यांनी केला आहे. मालीवाल यांनी विभव कुमारविरोधात एफआयआर दाखल केली आहे. त्यानंतर दिल्ली पोलिसांनी विभव कुमार यास अटक केलू आहे.

दरम्यान, स्वाती मालीवाल यांची दिल्लीतील अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था अर्थात एम्समध्ये वैद्यकीय तपासणी करण्यात आली. त्यामध्ये आपच्या राज्यसभा सदस्य स्वाती मालीवाल यांच्या शरीरावर एकूण 4 ठिकाणी जखमांच्या खुणा आढळून आल्या आहेत. स्वाती मालीवाल यांच्या डाव्या पायाला दुखापत झाल्याचे वैद्यकीय अहवालात स्पष्ट झाले आहे. स्वाती मालीवाल यांच्या उजव्या गालावर डोळ्याच्या खाली जखमाही आढळल्या. स्वाती मालीवाल यांच्या पायाला आणि उजव्या डोळ्याखाली एकूण चार ठिकाणी जखमा आढळल्या आहेत.

 
 

 
 

 

 
Powered By Sangraha 9.0