मतदानाचे चार टप्पे पूर्ण; स्वामी विश्वेश्वरानंद गिरि जी महाराजांनी केले सूचक विधान

    18-May-2024
Total Views |

Swami Vishweshwaranand Giri Maharaj
(Swami Vishweshwaranand Giri Maharaj)

मुंबई (प्रतिनिधी) :
देशात राम लल्लाचे मंदिर बनले, कलम ३७० रद्द झाला, समान्य वर्गातील लोकांचे बँक खाते उघडले, असा विकास होत राहावा यासाठी राष्ट्रहिताचा विचार करून प्रत्येकाने मतदान करावे, असे आवाहन महामण्डलेश्वर श्री स्वामी विश्वेश्वरानंद गिरि जी महाराज यांनी केले आहे. मतदानाचे चार टप्पे पार पडले असून येत्या आठवड्यात उरलेले तीन टप्पे होणार आहेत. त्यानिमित्ताने प्रत्येकाने मतदान करण्याबाबत स्वामीजींनी सांगितले आहे.

हे वाचलंत का? : रामनाथ कोविंद सहपरिवार श्रीरामललाचरणी लीन



भारतात राहणाऱ्या सुबुद्ध नागरिकांना ते म्हणालेत की, पाच वर्षांनी लोकशाहीच्या उत्सवात एक यज्ञ होत असून सर्वांनी घराबाहेर पडून आपली समिधा त्या यज्ञात वाहायची आहे. आपल्या एका मताने सरकार बनू शकते. भारताने विकास करावा, तो सुखी व्हावा, तो सदृढ व्हावा, भारताच्या सीमा सुरक्षित व्हाव्यात, भारतात राहणारे आपल्या धर्माची-संस्कृतीचे, परंपरांचे रक्षण करू शकतील, यासाठी मतदान करण्याकरीता प्रत्येकाने घराबाहेर पडणे आवश्यक आहे.