संजय राऊतांना 'ते' वक्तव्य भोवलं! गुन्हा दाखल

    18-May-2024
Total Views |

Sanjay Raut 
 
अहमदनगर : उबाठा गटाचे नेते संजय राऊत यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींचा एकेरी उल्लेख केल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. त्यांच्यावर अहमदनगरमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.
 
"औरंगजेबाचा जन्म गुजरातमध्ये झाला होता. जिथे मोदी जन्माला आले तिथे औरंगजेब जन्माला ला. २७ वर्ष औरंगजेब महाराष्ट्र जिंकण्यासाठी मरत होता आणि शेवटी आम्ही त्याला या महाराष्ट्रात गाडून त्याची कबर खणलेली आहे. तेव्हा नरेंद्र मोदी तू कोण आहे?," असं वादग्रस्त वक्तव्य संजय राऊतांनी केलं होतं.
 
हे वाचलंत का? -  मानखुर्दला छत्रपती शिवाजी महाराज नगर नाव देणार!
 
महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत त्यांनी हे वक्तव्य केलं होतं. याबद्दल आता त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संजय राऊतांच्या विरोधात भादंवि कलम १७१(क) ५०६ आणि लोकप्रतिनिधी अधिनियम १२३ (३) नुसार हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे त्यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.