“मतदान हे आपलं कर्तव्य आणि ते बजावलंच पाहिजे”, प्रसाद ओकने केले आवाहन

    18-May-2024
Total Views |
अभिनेता प्रसाद ओकने केले मतदान करण्याचे आवाहन
 
 

prasad oak  
 
 
मुंबई : लोकसभा निवडणूकीचा अंतिम टप्पा जवळ आला असून २० मे रोजी चो संपन्न होणार आहे. आत्तापर्यंत चार टप्प्यांमध्ये झालेल्या मतदानात लोकांनी आपला हक्क बजावला असून शेवटच्या टप्प्यातही लोकांनी भरघोस मतदान करावे असे आवाहन कलाकारांकडून देखील केले जात आहे. अभिनेता-दिग्दर्शक प्रसाद ओक याने देखील एका व्हिडिओच्या माध्यमातून नागरिकांना मतदानाचे महत्व पटवून दिले आहे.
 
प्रसाद ओक म्हणाला, “लोकशाहीने आपल्याला दिलेला एक मुलभूत हक्क म्हणजे मतदान. मतदान करायलाच हवं. मतदानाच्या दिवशी शासनाने जी सुट्टी दिली असते, ती आपण वेळेत जाऊन मदतान करण्यासाठी दिली असते. त्यामुळे त्या सुट्टीचा सदुपयोग करुन मतदान करा. कारण मतदान हे आपलं कर्तव्य आहे ते आपण बजावलंच पाहिजे”.
 
 
 
दरम्यान, प्रसाद ओक याच्या आगामी चित्रपटांबद्दल बोलायचे झाल्यास लवकरच त्याचा 'धर्मवीर २' हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. याशिवाय 'महापरिनिर्वाण' चित्रपटात ते नामदेव व्हटकर ज्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची महापरिनिर्वाण यात्रा कॅमेऱ्यात कैद केली त्यांची व्यक्तीरेखा साकारणार आहे.