‘कान्स’मध्ये झळकला सिद्धार्थ जाधवचा ‘हा’ मराठी चित्रपट, अभिनेता झाला भावूक...

    18-May-2024
Total Views |
sidd 
 
 
मुंबई : फ्रान्समध्ये सुरु असलेल्या ७७ व्या कान्स चित्रपट महोत्सवात मराठमोळा अभिनेता सिद्धार्थ जाधव याचा एक चित्रपट दाखवण्यात आला आहे. केवळ सिद्धार्थ साठीच नव्हे तर संपुर्ण मराठी चित्रपटसृष्टीसाठी हा मानाचा क्षण आहे. हा चित्रपट म्हणजे ‘हजार वेळा शोले पाहिलेला माणूस’ (Cannes Film Festival 2024). पण, सिद्धार्थ सध्या त्याच्या आगामी इतर चित्रपटांच्या शुटींगमध्ये व्यस्त असल्यामुळे तो कान्सला जाऊ शकला नाही आहे. त्याने भावूक पोस्ट देखील या संदर्भात केली आहे.
 
sidd 
 
शोले चित्रपट बघितला नाही असं क्वचितच कुणीतरी असेल. याच चित्रपटाच्या नावावरुन तयार करण्यात आलेला हजार वेळा शोले पाहिलेला माणूस हा चित्रपट कान्समध्ये दाखवण्यात आला. यात अभिनेता सिद्धार्त जाधव मुख्य भूमिकेत होता.
सिद्धार्थ जाधवने याबद्दल एक सोशल मीडियावर पोस्ट करत त्याच्या भावना शेअर केल्या आहेत. “CANNES फिल्म फेस्टिवलबद्दल खूप वेळा ऐकलं होतं.जेव्हा जेव्हा इथे आपला "मराठी सिनेमा" गेला आहे तेव्हा तेव्हा अभिमान वाटायचा.CANNES फिल्म फेस्टिवल 2024 मध्ये 'हजार वेळा शोले पाहिलेला माणूस' या चित्रपटाचे स्क्रीनिंग होत आहे आणि मी त्या सिनेमाचा भाग आहे .... super happy वाटतंय.. कान्स फिल्म फेस्टिवलमध्ये जिथे जगभरातून गौरविलेले सिनेमे येतात आणि बघितले जातात ..तिथे आपल्या "मराठी सिनेमाचं" स्क्रीनिंग होत असल्याचा आनंद आहे”.
 

sidd 
 
या चित्रपटात सिद्धार्थसह दिलीप प्रभावळकर, सोनाली कुलकर्णी, मिलिंद शिंदे, प्राजक्ता दातार आणि किशोर कदम अशा मात्तबर कलाकारांची फळी या चित्रपटात आहे. लवकरच हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला देखील येणार आहे. ‘हजार वेळा शोले पाहिलेला माणूस’ या चित्रपटाच्या निमित्तानं जागतिक स्तरावर जुन्या आठवणींना उजाळा मिळणार आहे.