मोठी बातमी - बँकिंग क्षेत्राचे प्रणेते नारायण वाघूळ यांचे निधन ८८ व्या वर्षी प्राणज्योत मालवली

२००९ साली त्यांना शासनाने पद्मभूषण पुरस्कार दिला होता.

    18-May-2024
Total Views |

Narayan Vagul
 
 
मुंबई: पद्मभूषण पुरस्कार विजेते आणि नामवंत बँकर नारायण वाघूळ यांचे निधन झाले आहे. भारतातील बँकिग क्षेत्रात त्यांचे मोठे योगदान होते. देशातील एक उत्कृष्ट बँकर म्हणून त्यांचा नामोल्लेख अनेक वेळा झाला आहे. चेन्नई येथील अपोलो हॉस्पिटलमध्ये त्यांचे निधन झाले आहे. ते ८८ वर्षांचे होते. त्यांचे पार्थिव राहत्या घरी अत्यंदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे.
 
२००९ साली वाघूळ यांना पद्मभूषण पुरस्कार मिळाला होता. त्यांचा बँकिंग विषयात गाढा अभ्यास होते. 'आयसीआयसीआय बँक' चे प्रणेते म्हणून त्यांना ओळखले जाते. सर्वांत कमी वयात ते अनेक बँकांच्या संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी पदावर पोहोचले होते. बँक ऑफ इंडियाच्या चेअरमनपदी त्यांची ४४ व्या वर्षी निवड झाली होती. स्पष्टवक्तेपणा व उत्कृष्ट कार्यपद्धती अशी त्यांची ओळख होती.
 
याशिवाय नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग मॅनेजमेंटमध्ये त्यांनी विद्यार्थ्यांना बँकिगचे धडे देखील दिले होते. वयाच्या ३९ व्या वर्षी ते सेंट्रल बँकेचे कार्यकारी संचालक देखील झाले होते. त्यांच्या योगदानाबद्दल त्यांना अनेक पुरस्कार प्राप्त झाले होते. भारतातील बँकिंग क्षेत्रातील मोठे नाव म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. त्यांनी आपल्या बँकिंग क्षेत्रातील अनुभवांविषयी ' रिफ्लेकशन ' नावाचे पुस्तक देखील लिहिले होते. त्यांच्या मागे पत्नी, मुलगी, मुलगा असा परिवार होता. त्यांची किर्ती जगभर होती. माजी पंतप्रधान राजीव गांधी यांनी त्यांच्याबद्दल ऐकत त्यांना तत्कालीन आयसीआयसीआय बँकेची जबाबदारी त्यांनी सुपूर्द केली होती.