"देशाला नरेंद्र मोदी यांच्याशिवाय पर्याय नाही”

    17-May-2024
Total Views |

modi 
 
 
मुंबई : लोकसभा निवडणूकीच्या पाचव्या अर्थात शेवटच्या टप्प्यातील मतदान जवळ आले असून ही निवडणूक फार चुरशीची असणार आहे. या निवडणूकीच्या वातावरणात कलाकारांनी देखील आपली राजकीय बाजू ठामपणे मांडली आहे. अभिनेता अभिजित केळकर याने देखील आपले मत मांडले आहे.
 
अभिनेता अभिजित केळकर म्हणाला की,"भाजपच्या सांस्कृतिक प्रकोष्टात असल्याचा मला आनंद आहे. लहानपणापासून मी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा सेवक आहे याचाही मला अभिमान आहे. त्यामुळे मी या पक्षाचा एक अविभाज्य भाग असून तुम्हाला आवाहन करतो की मिहिर कोटेचा यांना भरघोस मतांनी विजयी करा. तसेच, भारताचे कणखर नेर्तृत्व असणाऱ्या नरेंद्र मोदी यांनाही आमचा भाजप कार्यकर्ता म्हणून पाठिंबा आहे आणि त्यांच्याशिवाय देशाला पर्यात नाही".
 
 
 
"देशात नरेंद्र मोदी पुन्हा निवडून येतीलच पण मिहिर कोटेचा देखील ईशान्य मुंबईचे खासदार म्हणून निवडून येतील याची खात्री आहे. कारण आता मोदींशिवाय देशाला पर्याय नाही आहे.देशाला जर का मोदींचे नेर्तृत्व मिळाले तरच आपण विकसित भारत हा संकल्प जो २०४७ ला पुर्ण करायचा आहे तो पु्र्ण करु शकु. देशाला नरेंद्र मोदी आणि महाराष्ट्राला देवेंद्र फडणवीस यांच्यासारखे नेर्तृत्व असेल तर नक्कीच विकास निश्चित आहे", असे मत मयुरा बाणावली यांनी व्यक्त केले.