Q4 Results: महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीचा तिमाही निकाल कंपनीला २०३८ कोटींचा निव्वळ नफा

कंपनीच्या संचालक मंडळाने २१.२० रुपयांचा लाभांश (Dividend) सुचवला

    17-May-2024
Total Views |

mahindra and mahindra
 
 
 
मुंबई: महिंद्रा अँड महिंद्रा (एम अँड एम) कंपनीने आपल्या चौथ्या तिमाहीचा निकाल जाहीर केला आहे. कंपनीला चौथ्या तिमाहीत २०३८ कोटींचा निव्वळ नफा झाला आहे.कंपनीला इयर ऑन इयर बेसिसवर ४.४५ टक्क्यांनी नफ्यात वाढ झाली आहे. कंपनीचा नफा तिमाही बेसिसवर (QoQ) ३.६% टक्क्यांनी वाढ झाली आहे. तर कंपनींच्या महसूलात ०.४४ टक्क्यांनी वाढ झाली आहे. कंपनीच्या विक्री, सर्वसाधारण, आस्थापना खर्चात १.७५ टक्क्यांने घट झाली आहे. इयर ऑन इयर बेसिसवर कंपनीच्या खर्चात २.१ टक्क्यांनी वाढ झाली आहे.
 
कंपनीच्या कामकाजातून मिळणाऱ्या महसूलात (Revenue From Operations) ११ टक्क्यांनी वाढ होत मागील वर्षाच्या २२५७१ कोटींचा तुलनेत यावर्षी २५१०९ कोटींवर वाढला आहे.कंपनीचा ईबीआयटीडीए (कर व खर्च पूर्व उत्पन्न) मागील वर्षाच्या तुलनेत २२ टक्क्यांनी वाढले आहे. मागील वर्षी कंपनीला २८३१ कोटींचे उत्पन्न मिळाले असून यावर्षी कंपनीला ३४४६ कोटींचे उत्पन्न मिळाले आहे.
 
निकालाविषयी प्रतिक्रिया देताना, एम अँड एम कंपनीचे कार्यकारी संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी अनिश शहा म्हणाले, 'आमच्या बऱ्याच व्यवसायांनी उच्च स्तरीय कामगिरी प्रदान केल्याने हे वर्ष उत्कृष्ट ठरले आहे. ऑटोने आपला उच्च वाढीचा मार्ग पुढे चालू ठेवला, फार्मने कठीण बाजारपेठेत वाटा मिळवला आणि महिंद्रा फायनान्सने मालमत्तेच्या गुणवत्तेवर वितरीत केले.'
 
संचालक मंडळाने प्रत्येक समभागावर २१.२० रुपयांचा लाभांश सुचवला आहे. याबाबत अंतिम निर्णय भागभांडवलधारकांच्या बैठकीत होण्याची शक्यता आहे.