रविवारी मध्य रेल्वेवर मेगा ब्लॉक

मध्य रेल्वेच्या मुंबई विभागावर रविवारी मेगा ब्लॉक

    17-May-2024
Total Views |

megablock


मुंबई, दि.१७ : प्रतिनिधी 
मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाने रविवार, दि. १९ रोजी विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे पूर्ण करण्यासाठी उपनगरीय विभागांवर मेगा ब्लॉक घेणार असल्याचे जाहीर केले आहे. माटुंगा ते मुलुंड दरम्यान अप आणि डाऊन जलद मार्गावर सकाळी ११.०५ ते दुपारी ३.५५ वाजेपर्यंत मेगा ब्लॉक असेल. तर अप आणि डाऊन हार्बर मार्गावर कुर्ला ते वाशी स्थानकांदरम्यान सकाळी ११.१० ते दुपारी ४.१० वाजेपर्यंत मेगा ब्लॉक असेल अशी माहिती मध्य रेल्वेने दिली आहे.
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सकाळी १०.२५ ते दुपारी ३.३५ या वेळेत सुटणाऱ्या डाऊन जलद मार्गावरील गाड्या माटुंगा ते मुलुंड स्थानकांदरम्यान डाऊन धीम्या मार्गावर वळविण्यात येतील आणि १५ मिनिटे उशिराने गंतव्य स्थानकावर पोहोचतील. या गाड्या आपल्या नियोजित थांब्यावर थांबतील. ठाणे पुढे जाणाऱ्या जलद गाड्या पुन्हा मुलुंड येथे डाऊन जलद मार्गावर वळविण्यात येणार आहेत. ठाणे येथून सकाळी १०.५० ते दुपारी ३.४६ या वेळेत सुटणाऱ्या अप जलद मार्गावरील गाड्या मुलुंड येथे अप धीम्या लाइनवर वळविण्यात येतील आणि पुन्हा माटुंगा येथील अप जलद मार्गावर वळवल्या जातील. या गाड्या नियोजित थांब्यावर थांबतील व नियोजित वेळेपेक्षा १५ मिनिटे उशिराने त्यांच्या गंतव्यस्थानी पोहोचतील.
डाउन धीमी लाइनवर ब्लॉकपूर्वी शेवटची लोकल बदलापूर लोकल असेल जी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सकाळी १०.२० वाजता सुटेल. ब्लॉकनंतर पहिली लोकल बदलापूर लोकल असेल जी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून दुपारी ३.३९ वाजता सुटेल. तर अप धीमी लाइनवर ब्लॉकपूर्वीची शेवटची लोकल अंबरनाथ लोकल असेल जी सकाळी ११.१० वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे पोहोचेल. ब्लॉकनंतर पहिली लोकल आसनगाव लोकल असेल जी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे ४.४४ वाजता पोहोचेल.
अप आणि डाऊन हार्बर मार्गावर


छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सकाळी १०.३४ ते दुपारी ३.३६ वाजेपर्यंत वाशी/बेलापूर/पनवेलसाठी सुटणाऱ्या डाउन हार्बर मार्गावरील गाड्या आणि पनवेल/बेलापूर/वाशी येथून सकाळी १०.१६ ते दुपारी ३.४७ वाजेपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईसाठी सुटणाऱ्या अप हार्बर मार्गावरील गाड्या रद्द राहतील. ब्लॉक कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई-कुर्ला आणि पनवेल-वाशी या भागांवर विशेष उपनगरीय गाड्या धावतील. हार्बर मार्गावरील प्रवाशांना सकाळी १० ते संध्याकाळी ६ या कालावधीतल ठाणे-वाशी/नेरुळ स्थानकांदरम्यान प्रवास करण्याची परवानगी आहे.
डाऊन हार्बर मार्गावर ब्लॉकपूर्वीची शेवटची लोकल पनवेल लोकल असेल जी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सकाळी १०.१८ वाजता सुटेल. ब्लॉकनंतर पहिली लोकल पनवेल लोकल असेल जी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून दुपारी ३.४४ वाजता सुटेल. अप हार्बर मार्गावर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईसाठी ब्लॉकपूर्वीची शेवटची लोकल असेल जी पनवेल येथून सकाळी १०.०५ वाजता सुटेल. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईसाठी ब्लॉकनंतर पहिली लोकल असेल जी पनवेल येथून दुपारी ३.४५ वाजता सुटेल.