नागपूर येथे 'कार्यकर्ता विकास वर्ग-द्वितीय'ला सुरुवात

देशभरातून ९३६ शिक्षार्थी वर्गात सहभागी

    17-May-2024
Total Views |

RSS Nagpur

मुंबई (प्रतिनिधी) :
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या 'कार्यकर्ता विकास वर्ग-द्वितीय'चे (Karyakarta Vikas Varg) उद्घाटन शुक्रवार, दि. १७ मे रोजी डॉ. हेडगेवार स्मृती मंदिर संकुलातील महर्षी व्यास सभागृह, रेशीमबाग, नागपूर येथे करण्यात आले. वर्ग प्रमुख इकबाल सिंग जी, सह सरकार्यवाह डॉ. कृष्ण गोपाल जी आणि वर्गाचे पालक अ.भा.सेवा प्रमुख पराग अभ्यंकर यांनी वर्गाच्या सुरुवातीला भारतमातेच्या प्रतिमेला पुष्प अर्पण केले. दरम्यान सह सरकार्यवाह मुकुंदजी आणि रामदत्त चक्रधर जी देखील उपस्थित होते. देशभरातून ९३६ शिक्षार्थी वर्गात सहभागी झाले आहेत. वर्गाचा समारोप १० जून रोजी होणार आहे.

स्वयंसेवकांना संबोधताना पराग अभ्यंकर म्हणाले की, नागपूरला जाऊन संघाकार्य जाणणे व ते आचरणात आणणे, तसेच संघकार्य हेच जीवनकार्य व्हावे ही भावना स्वयंसेवकांच्या मनात कायम असते. कारण ही भूमी प.पू.डॉ.हेडगेवार आणि प.पू.श्रीगुरुजींच्या वास्तव्याचे पवित्र स्थान आहे. संघ कार्यात प्रशिक्षण वर्गाला खूप महत्त्व आहे. त्यामुळे जसजसे काम वाढत गेले तसतसे प्रांतीय ठिकाणीही प्रशिक्षण वर्ग होऊ लागले. बंदीचा काळ आणि कोरोनाचा काळ वगळता संघाचे शिक्षण वर्ग कधीच रोखले गेले नाहीत. वेळेनुसार प्रशिक्षण वर्गाचा कालावधी आणि अभ्यासक्रमातही बदल करण्यात आले."

RSS Nagpur

पुढे ते म्हणाले, "कार्यकर्त्याची विचारसरणी काय असावी, त्याच्यासमोरील आव्हाने काय आहेत, हे लक्षात घेऊन यंत्रणांमध्येही बदल करण्यात आले. पूर्वीच्या वर्गांमध्ये, शारीरिक कार्यक्रमांतर्गत संयम आणि धैर्य वाढवण्यावर भर दिला जात असे. आता आव्हाने बदलली आहेत, त्याचे संदर्भ समजून घ्यावे लागतील. आव्हानांना प्रतिसाद देण्याची गरज असेल तर अशा विषयांचाही या वर्गात समावेश करण्यात आला आहे."

RSS Nagpur

कार्यकर्ता विकास वर्गाबाबत बोलताना ते म्हणाले, "या वर्गाची रचना ही संघटित हिंदू समाजाची जागतिक दृष्टी निर्माण करणारी असेल. या वर्गात शिक्षार्थ्यांना समाजातील सज्जन-शक्तीशी जोडून आपली शक्ती कशी वाढवायची याचे व्यावहारिक प्रशिक्षणही मिळेल. संपूर्ण भारतातून शिकाऊ स्वयंसेवक येथे प्रशिक्षणासाठी येतात, ज्यामुळे राष्ट्रीय एकात्मतेची भावना वाढते. हिंदुत्वाची एकात्मता इथेही जाणवते."