भारतीय मसाला मंडळ मसाला कंपन्यांची क्वालिटी चेकिंग करणार?

एवरेस्ट व इतर कंपन्यांचे "क्वालिटी चेकिंग" सुरु

    17-May-2024
Total Views |

Masala
 
 
मुंबई: पुन्हा एकदा एव्हरेस्ट व इतर मसाला कंपन्या अडचणीत आल्या आहेत. भारतीय मसाला मंडळाने हाँगकाँग येथे मसाल्याची छाननी करण्यात आल्यावर इथीलीन ऑक्साइडचे प्रमाण मिळाल्यावर नवी चौकशी सुरू केली आहे. भारतातील उत्पादनाचे ' क्वालिटी चेकिंग ' सुरू करण्यात आले असून मसाला कंपन्यांची कसून चौकशी होण्याची शक्यता आहे.
 
हाँगकाँग सेंटर फॉर फूड सेफ्टी (CFS) ने कर्करोग होण्यास कारणीभूत ठरणाऱ्या इथीलीन ऑक्साइडचे प्रमाण आढळले असल्याचे काही दिवसांपूर्वी सांगितले होते. सरकारच्या रडारवर असलेली मुख्य उत्पादने म्हणजे मद्रास करी पावडर, एवरेस्ट फिश करी मसाला, पावडर मिक्स मसाला पावडर या उत्पादनांची सखोल चौकशी होण्याची शक्यता आहे.
 
एमडीएच, एव्हरेस्ट व इतर लोकप्रिय मसाला कंपन्यांच्या जागतिक पातळीवर उत्पादनांची चौकशी सुरु असताना विविध देशांतील नियामक मंडळे या मसाला उत्पादनावर आक्षेप घेत आहेत. या मसाल्याची निर्यात युरोप,आशिया, उत्तर अमेरिका व विविध प्रदेशांमध्ये होते.
 
प्रसारमाध्यमांना सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कंपन्यांच्या मसाला बनवण्याच्या प्रक्रियेत चेकिंग करण्यात येणार असून त्यातील वापरल्या जाणाऱ्या पदार्थांची शहानिशा होऊ शकते. आंतरराष्ट्रीय मानक असलेल्या उत्पादनांच्या पद्धतीनुसार प्रक्रिया सुरू आहे की नाही याची खात्री मसाला बोर्ड करण्याची दाट शक्यता आहे.
 
याआधी एवरेस्टने आपण सगळ्या सुरक्षेच्या प्रकिया पार पाडत प्रयोगशाळेत मान्यता देण्यात आल्यानंतरच मसाल्याची विक्री करत असल्याचा दावा केला होता. सेवन करण्यासाठी योग्य असलेली उत्पादनेच विक्री व निर्यातीसाठी असुन या मसाल्यात कुठलाही हानिकारक पदार्थांचा समावेश नसल्याचा दावा यापूर्वी मसाला कंपन्यांनी केला होता.