'धाम सरकार' यांची मोठी भविष्यवाणी! म्हणाले, "४०० चा आकडा..."

    17-May-2024
Total Views |


Dham Sarkar Bapcha

मुंबई (प्रतिनिधी) :
(Dham Sarkar Bapcha) मध्य प्रदेशच्या खुटालिया वेकुंठ धाम, बापचा सेवा संस्थान येथील धाम सरकार यांचा एक व्हिडिओ समोर आला आहे. सध्या होत असलेल्या निवडणुकीत एनडीए ४०० चा आकडा पार करणार असल्याची मोठी भविष्यवाणी धाम सरकार यांनी केली आहे. त्यांचा व्हिडिओ त्यांच्याच सोशल मिडिया अकाऊंटवर पोस्ट करण्यात आला आहे.

हे वाचलंत का? : चारधाम यात्रेदरम्यान मोबाईल फोनवर बंदी; पाहा नेमकं कारण काय?
धाम सरकार यांच्या मते, लोकसभा निवडणुकीत भाजपला ३६५ मतं मिळतील तर एनडीए सर्वाधित ४२२ मतांनी पुढे असेल. यावरून देशात पुन्हा एकदा मोदी सरकार येणार असल्याचा दावा धाम सरकारनी केला आहे. सोबतच २०२८ ते २०३२ दरम्यान भारत विश्वगुरु बनेल, असेही त्यांनी म्हटले आहे.