महाराष्ट्र साहित्य परिषदेची विशेष ग्रंथकार पारितोषिके जाहीर

    16-May-2024
Total Views |

maharashtra sahitya parishad 
 
मुंबई : महाराष्ट्र साहित्य परिषदेची विशेष ग्रंथकार पारितोषिके नुकतीच जाहीर करण्यात आली. ही पारितोषिके २६ मे रोजी सकाळी ११.०० वा. एस. एम. जोशी सभागृहात ज्येष्ठ साहित्यिक आणि साहित्य अकादमीचे अध्यक्ष माधव कौशिक यांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहेत. अशी माहिती महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांनी दिली. महाराष्ट्र साहित्य परिषदेचे अध्यक्ष डॉ. रावसाहेब कसबे यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या कार्यक्रमाला परिषदेच्या विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष डॉ. शिवाजीराव कदम, कार्यकारी विश्वस्त डॉ. पी. डी. पाटील, विश्वस्त यशवंतराव गडाख, उपाध्यक्ष डॉ. तानाजीराव चोरगे, राजीव बर्वे आणि विद्याधर अनास्कर उपस्थित राहणार आहेत. रोख रक्कम आणि सन्मानपत्र असे या पारितोषिकाचे स्वरूप आहे.
 
 
पारितोषिक प्राप्त लेखक व पुस्तक
 
रमेश चव्हाण (विसाव्या शतकातील मराठा समाज), दीपक घारे (कला-समाज-संस्कृती), विक्रम भागवत (झोका), देवा झिंजाड (एक भाकर तीन चुली), समीर गायकवाड (झांबळ), स्नेहा अवसरीकर (बारीक-बारीक आवाज वाढत चाललेत), करुणा गोखले (ऐसपैस गप्पा नीलमताईंशी), डॉ. केशव सखाराम देशमुख (भाषा आणि संस्कृती), पंकज भोसले (हिट्स ऑफ नाइन्टी टू), डॉ. गजानन सीताराम शेपाळ (रंगसभा), नेहा भांडारकर (मीमांसा आणि (प्रे) श्रेयसचा वेध), पी. विठ्ठल (संभ्रमाची गोष्ट), रजिया सुलताना (रजनी ते रजिया), उज्ज्वला बर्वे (माझा ब्रँड आजादी), डॉ. प्रमोद पाठक (पुरातत्त्वावर वेदमुद्रा), डॉ. श्रीधर पवार (ब्लॅक पॅन्थर), डॉ. विनायक गंधे (साहित्य : अभिजात आणि लोकप्रिय), संजय आर्वीकर (आत्म-प्रकाश), रविमुकुल संपादक (मराठी भावसंगीत कोश-खंड १ व २), डॉ. वंदना रवींद्र घांगुर्डे (मराठी संगीत रंगभूमी), रमेश ओझा, श्याम पाखरे (नोआखाली-माणुसकीचा अविरत लढा), विजय धोंडीराम जाधव (शिवार), स्वानंद बेदरकर(संपादक) (शब्द कल्पिताचे न पाठवलेली पत्रे), दीपाली दातार (पैस प्रतिभेचा), दिलीप नाईक निंबाळकर (अंत्राळी), गौरी रत्नपारखी (रूम नं. ६), प्रसाद तारे (छत्रपती शिवाजी महाराज : व्यक्तिमत्त्वाचे भावदर्शन), सावित्री जगदाळे (उजळपरी-गद्य), डॉ. सुरेश सावंत (एलियन आला स्वप्नात-पद्य), रविबाला काकतकर (आत्मसामर्थ्य – मंत्र प्रतिसादांचा), विनायक कुलकर्णी (अर्थमेळ), अपूर्वा प्रदीप जोशी (आर्थिक गुन्हेगारीचे अंतरंग हर्षद ते हिंडनबर्ग), अनिता पाध्ये (प्यार जिंदगी है !), डॉ. अविनाश भोंडवे (स्वास्थ्य संवाद), डॉ. जयदेव पंचवाघ (न्यूरोसर्जरीच्या पाऊलखुणा), क्रांती हरेश पैठणकर(प्रबंध) (निवडक सामाजिक कार्यकर्त्या स्त्रियांची आत्मकथने : एक अभ्यास), डॉ. शांताराम गायकवाड (वासराचे व्यावसायिक संगोपन) या मान्यवर लेखकांच्या ग्रंथांना ही पारितोषिके जाहीर झाली आहेत.