अंधेरी आणि गोरेगावात पाणीपुरवठा होणार प्रभावित

मुंबई महानगरपालिकेकडून जलवाहिनी दुरुस्तीची कामे

    16-May-2024
Total Views |

bmc


मुंबई, दि.१६ : प्रतिनिधी 
मुंबई महानगरपालिकेतर्फे के पूर्व विभागात अंधेरी (पूर्व) येथील ‘बी. डी. सावंत मार्ग व कार्डिनल ग्रासिअस मार्ग जंक्शन ते कार्डिनल ग्रासिअस मार्ग व सहार मार्ग जंक्शन' येथे प्रत्येकी १५०० मिलीमीटर व्यासाची जलवाहिनी आणि नवीन १२०० मिलीमीटर व्यासाची जलवाहिनी (पार्ले आऊटलेट) या दोन मुख्य जलवाहिन्या जोडण्याचे व जुनी नादुरुस्त १२०० मिलीमीटर व्यासाची जलवाहिनी काढून टाकण्याचे हाती घेण्यात येणार आहे. हे काम बुधवार, दि. २२ मे रोजी सकाळी ९ वाजेपासून गुरुवार, दिनांक २३ मेच्या मध्यरात्री १ वाजेपर्यंत (१६ तास) हाती घेण्यात येणार आहे.
हे काम पूर्ण झाल्यानंतर वेरावली जलाशय १, २, ३ ची पाण्याची पातळी सुधारेल व त्यामुळे अंधेरी (पूर्व) व (पश्चिम), जोगेश्वरी (पूर्व) व (पश्चिम), विलेपार्ले (पूर्व) व (पश्चिम) या भागांच्या पाणीपुरवठ्यामध्ये कायमस्वरुपी सुधारणा होणार आहे. या कालावधीत म्हणजे बुधवार, दि २२ मे रोजी सकाळी ९ वाजेपासून गुरुवार, दि २३ मे रोजी मध्यरात्री १ वाजेपर्यंत (१६ तास) के पूर्व, के पश्चिम व पी दक्षिण विभागातील काही परिसरांतील पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहणार आहे. या संबंधित परिसरातील नागरिकांनी कृपया पाणी जपून व काटकसरीने वापरावे. तसेच पाणीपुरवठा सुरळीत झाल्यानंतर खबरदारीचा उपाय म्हणून ४ ते ५ दिवस पाणी गाळून व उकळून वापरावे, असे आवाहन महानगरपालिका प्रशासनातर्फे करण्‍यात आले आहे.


पाणीपुरवठा बंद

1. के पूर्व विभाग- त्रिपाठी नगर, मुन्शी कॉलनी, बस्तीवाला कंपाऊंड, कलेक्टर कॉलनी मातोश्री क्लब, दुर्गा नगर
2.के पूर्व विभाग- दुर्गा नगर, सारीपुत नगर 
3.के पूर्व विभाग- दत्त टेकडी, ओबेराय स्प्लेंडर, केलती पाडा, गणेश मंदीर परिसर जोगेश्वरी-विक्रोळी जोडरस्ता
4.के पूर्व विभाग- बांद्रेकर वाडी, फ्रान्सिस वाडी, मखरानीपाडा, सुभाष मार्ग, चाचा नगर
5.के पूर्व विभाग- वांद्रे भूखंड, हरी नगर, शिवाजी नगर, पास्कल वसाहत, शंकरवाडी
6.के पूर्व विभाग- विशाल सभागृह, वर्मा नगर, कामगार कल्याण, मांजरेकरवाडी, बिमा नगर, पंथकी बाग, तेली गल्ली, हाजी जुमान चाळ, कोळ डोंगरी, जीवा महाले मार्ग, साई वाडी, जीवन विकास केंद्र, शिवाजी नगर, संभाजी नगर, हनुमान नगर, श्रद्धानंद मार्ग, नेहरू मार्ग, तेजपाल मार्ग, शास्त्री नगर, आंबेडकर नगर, काजूवाडी, विलेपार्लेचा बहुतांश भाग
7. के पूर्व विभाग- पंप हाउस, विजय राउत मार्ग, पाटीलवाडी, हंजर नगर, झगडापाडा, पारसी वसाहत, जिजामाता मार्ग, गुंदवली हिल, आशीर्वाद चाळ
8.के पूर्व विभाग- जुना नागरदास मार्ग, मोगरपाडा, नवीन नागरदास मार्ग, पारसी पंचायत मार्ग, आर. के. सिंग मार्ग, निकोलस वाडी परिसर
9. पी दक्षिण विभाग– राम मंदीर मार्ग, गोरेगाव (पश्चिम)
10.के पश्चिम विभाग– सी. डी. बर्फीवाला मार्ग, उपाश्रय गल्ली, स्वामी विवेकानंद मार्ग अंधेरी, दाऊद बाग, केव्हणी पाडा, धाकुशेठ पाडा, मालकम बाग, अंधेरी बाजार, भर्डावाडी, आंब्रे गार्डन पंप
11. के पश्चिम विभाग– जुहू-कोळीवाडा, जुहू तारा मार्ग
12.के पश्चिम विभाग– देवराज चाळ, स्वामी विवेकानंद मार्ग (JVLR ते जोगेश्वरी बस आगार)
 
13.के पश्चिम विभाग– विलेपार्ले (पश्चिम), लल्लूभाई पार्क, लोहिया नगर, विलेपार्ले गावठाण, मिलन सबवे, संपूर्ण जुहू परिसर, व्ही. एम. मार्ग, नेहरू नगर
14.के पश्चिम विभाग– मोरागाव, जुहू गावठाण
15. के पश्चिम विभाग– यादव नगर, सहकार मार्ग, बांदिवली हिल, मोमीन नगर, खजूरवाडी, जोगेश्वरी फाटक, जोगेश्वरी स्थानक मार्ग, कॅप्टन सामंत मार्ग (भाग)
16. के पश्चिम विभाग– गिल्बर्ट हिल, सागर सिटी, गावदेवी डोंगरी, जुहू गल्ली, वायरलेस मार्ग, श्रीनाथ नगर
पाणीपुरवठा कमी दाबाने

1.पी दक्षिण विभाग– बिंबीसार नगर, बांद्रेकर वाडी, वनराई, राज्य राखीव पोलीस दल परिसर
2.के पश्चिम विभाग– चार बंगला, डी. एन. नगर, जुहू-वेसावे जोडरस्ता