'लग्न कर नाहीतर तुझ्या चेहऱ्यावर ऍसिड फेकू'; वसीमने केली मुलीवर जबरदस्ती

    16-May-2024
Total Views |
 वसिम
 
लखनौ : उत्तरप्रदेशातील अमरोहा जिल्ह्याातील एका तरुणीने विनयभंग आणि लग्नासाठी जबरदस्ती केल्याची तक्रार दाखल केली आहे. या पिडीतेला वसिम नाव्याच्या तरुणाने अॅसिड हल्ला करण्याची, निकाह नाही केला तर अश्लिल विडीयो वायरल करण्याची आणि पिडीतेच्या भावाला खोट्या बलात्काराच्या केस मध्ये अडकवण्याची धमकी दिल्याचे आरोप पिडीत तरुणीने केली आहे.
 
ही घटना ८ मे २०२४ ला घडली आणि मंगळवार १४ मे २०२४ ला पोलिसांनी वसीमसह आणखिन ५ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करुन तपास आणि कारवाई सुरु केली आहे. वसीम, कासिम, दिलनवाज, कामिल आणि मुन्ना अशी या आरोपींची नावे आहेत. तक्राप देताना पिडीत महीलेने ही घटना ८ मे ला घडल्याचे सांगितले.
 
उत्तरप्रदेशमधील अमरोहा जिल्ह्यातील कोतवाली गावात घडलेली ही घटना आहे. आपल्या तक्रारीत पिडीत महीलेने म्हटले. की, तिच्या वस्तीत राहणारे वसीम, कासिम, दिलनवाज, कामिल आणि मुन्ना आपल्यावर वाईट नजर ठेवतात. भेटायला जाताना वसीम पीडितेचा विनयभंग करतो आणि तिच्यावर जबरदस्तीने लग्नासाठी दबाव टाकतो. पीडितेच्या म्हणण्यानुसार, जेव्हा तिने नकार दिला तेव्हा तिला सांगण्यात आले की त्यांच्याकडे अश्लील व्हिडिओ आहेत आणि जर तिने ऐकले नाही तर ते व्हायरल केले जातील.
 
पिडीतेच्या भावाच्या कानावर हे प्रकरण पोहोचल्यावर त्यांनी तीचा बचाव करण्याचा प्रयत्न केला. तर वसिमने त्याच्या अपंग बहीणीवर बलात्कार केल्याच्या खोट्या आरोपवरुन तुम्हाला तुरुंगात पाठवु अशी धमकी दिली. घटना घडली त्या दिवशी सायंकाळी सातच्या सुमारास पिडीत तरुणी तेथिल मशीदिजवळुन जात असताना वसीम, कासिम, दिलनवाज, कामिल आणि मुन्ना यांनी पीडितेला रस्त्यात अडवले आणि “आज आम्ही तुला तोंड दाखवायला कुठेही सोडणार नाही”. असं म्हणुन तिचा विनंयभंग केला. पिडीतेने घाबरुन आरडाओरडा केल्यावर लोक जमा झाले आणि ती आरोपींच्या तावडीतुन बचावली.