संदेशखालीमध्ये 'ममतां'च्या गुंडाकडून अत्याचार सुरूच; तक्रार मागे घेण्यासाठी पीडितेचे केले अपहरण
16-May-2024
Total Views |
कोलकाता : पश्चिम बंगालमधील संदेशखालीमध्ये अद्यापही भीतीचे आणि हिंसाचाराचे वातावरण आहे. टीएमसीचा बाहुबली गुंड नेता शाहजहान शेख आणि त्याच्या गुंडांच्या अत्याचाराच्या रोज नवनवीन कथा समोर येत आहेत, ज्याने लोकांना विचार करण्यास भाग पाडले आहबे. या संपूर्ण प्रकरणात आता टीएमसीचे गुंड पुन्हा सक्रिय झाले आहेत.
शेख शाहजहान आणि त्याच्या गुंडांच्या अत्याचाराला वाचा फोडणाऱ्या महिला आणि पीडितांना मारहाण आणि धमक्या देत आहेत, जेणेकरून शाहजहान शेखच्या विरोधात कोणतीही साक्ष देऊ नये. गुरुवार, दि. १६ मे २०२४ पश्चिम बंगाल भाजपने एक नवीन व्हिडिओ क्लिप जारी केली आहे, ज्यामध्ये पीडितेने संदेशखळी येथील पीडितांना शांत करण्यासाठी टीएमसी गुंड आणि कार्यकर्त्यांच्या जबरदस्तीबद्दल सांगितले आहे.
Today I visited Sandeshkhali, where TMC goons, are threatening the people to prove Sk. Shahjahan is innocent. One woman named Anwesha Mondal, told me about the atrocities of Dilip Mallickw who few days ago abducted a woman, Following this complaint, today evening, TMC goons… pic.twitter.com/5I69yekMku
संदेशखळी येथील महिलांच्या लैंगिक छळाच्या विरोधात बोलण्यात आघाडीवर असलेली अन्वेषा मंडल या व्हिडिओमध्ये दिसत असलेल्या महिलेचे नाव असल्याचा दावा भाजपने केला आहे. एक मिनिटांच्या व्हिडिओमध्ये, अन्वेषा मंडल यांनी टीएमसीच्या गुंडांनी त्यांचे अपहरण करून मारहाण केल्याचा आरोप केला आहे.
व्हिडिओमध्ये अन्वेषा मंडल म्हणाल्या की, "टीएमसीने धमकी दिली आहे की संदेशखळीच्या गुन्हेगारांना वाचवण्यासाठी तिने त्यांच्या बाजूने साक्ष दिली नाही तर तिला ठार मारले जाईल." अन्वेषा मंडल यांनी सांगितले की, टीएमसी नेत्यांवरील आरोपांविरोधात न्यायालयात निवेदन देण्यासाठी तिच्यावर दबाव आणला जात आहे.