ठाकरेंच्या कर्जत फार्महाऊसमध्ये जमिनीच्या खाली किती बॅग?

भाजप आमदार नितेश राणेंचा सवाल

    16-May-2024
Total Views |
 
Raut & Thackeray
 
मुंबई : मुख्यमंत्र्यांच्या बॅगप्रमाणेच उद्धव ठाकरेंचे कर्जतचे फार्माहाऊस तपासायला हवे. तिथे जमिनीच्या खाली किती बॅग आहेत याचा हिशोब झाला पाहिजे, असा घणाघात भाजप आमदार नितेश राणेंनी केला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या बॅगवर संजय राऊतांनी केलेल्या टीकेला त्यांनी प्रत्युत्तर दिले.
 
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाशिकमध्ये गेले असता हेलिकॉप्टरमधून त्यांच्या बॅग उतरवण्यात आल्या. या बॅगमध्ये पैसे असल्याचा दावा संजय राऊतांनी केला होता. त्यानंतर गुरुवारी मुख्यमंत्री शिंदे नाशिक दौऱ्यावर असताना त्यांच्या बॅग तपासण्यात आल्या. यावरून आता नितेश राणेंनी निशाणा साधला आहे.
 
हे वाचलंत का? -  घाटकोपर दुर्घटनेतील बचावकार्य पूर्ण! मृतांचा आकडा वाढला
 
नितेश राणे म्हणाले की, "जशा मुख्यमंत्री साहेबांच्या बॅग तपासण्यात आल्या तसंच एकदा उद्धव ठाकरेंचा 'कर्जत फार्महाउस' पण चेक होऊ द्या. तिथे किती बॅग जमिनीच्या खाली आहेत त्याचाही हिशोब झाला पाहिजे. हिम्मत असेल तर फार्महाऊसचे दरवाजे उघडा सब राझ खुल जायेंगे," असेही ते म्हणाले.
 
 
 
दरम्यान, यावर मुख्यमंत्री शिंदेंनीही प्रतिक्रिया दिली. चोराच्या मनात चांदणं आणि चोराच्या उलट्या बोंबा, अशी टीका त्यांनी संजय राऊतांवर केली. तसेच राऊतांना मी उत्तर देणार नाही, माझ्या प्रवक्त्यांना बोला, असा खोचक टोलाही त्यांनी लगावला आहे.