"कोणीही CAA हटवू शकत नाही, ही मोदींची गॅरंटी आहे"

पंतप्रधान मोदींचे इंडी आघाडीतील नेत्यांना आव्हान

    16-May-2024
Total Views |
 PM Modi
 
लखनौ : "तुमच्याकडे कितीही अधिकार असले तरी तुम्ही CAA हटवू शकणार नाही. तुम्ही ती हिम्मत करू शकत नाहीत. विरोधकांचा मुखवटा उतरवला आहे. गांधींचे नाव घेऊन लोक सत्तेत आले. या लोकांनी महात्मा गांधींचा विश्वास तोडला, मोदींची हमी म्हणजे काय याचे ताजे उदाहरण म्हणजे सीएए कायदा. कालच सीएए कायद्यांतर्गत निर्वासितांना भारतीय नागरिकत्व देण्याचे काम सुरू झाले आहे. हे ते लोक आहेत जे आपल्या देशात दीर्घकाळ निर्वासित म्हणून राहत आहेत, हे ते लोक आहेत जे धर्माच्या आधारावर भारताच्या फाळणीला बळी पडले होते." असे वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केले आहे.
 
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी उत्तर प्रदेशच्या आझमगढमध्ये प्रचारसभेत बोलताना विरोधकांवर चांगलाच निशाना साधला. ते म्हणाले, "देशातील कोणीही सीएए संपवू शकत नाही. देशातील प्रत्येक नागरिकाला माहीत आहे की, विरोधी पक्षांनी हिंदू-मुस्लिम अशी फूट पाडून आपली मतपेढी तयार केली आहे. मोदींनी त्यांचा खरा चेहरा समोर आणला आहे."
 
शेजारच्या देशातून आलेल्या शरणार्थींकडे काँग्रेसने दुर्लक्ष केले असा आरोप पंतप्रधान मोदींनी केला. ते म्हणाले की, काँग्रेसने भारतात आश्रय घेतलेल्या लोकांची कधीच काळजी घेतली नाही, कारण हे लोक त्यांची मतपेढी नाहीत. त्यापैकी बहुतांश ओबीसी आणि मागास-दलित बंधू-भगिनी आहेत. त्यांच्यावर अत्याचार होत राहिले. काँग्रेसही या लोकांनी असे खोटे पसरवले की देशात दंगली उसळल्या."