"हे मिनी पाकिस्तान आहे, तुझं इथे काय काम"; मोहल्ल्यात आला म्हणून 'जीवनदीप'ला नफीस, शोएबकडून मारहाण

    16-May-2024
Total Views |
 Chhattisgarh Bilaspur
 
रायपूर : छत्तीसगडमधील बिलासपूरमध्ये जीवनदीप सिंग नावाच्या तरुणावर अर्शद, नफीस, शोएब आणि राजा खान उर्फ सज्जाद अली यांनी हल्ला केला होता. जीवनदीपच्या गळ्यातील तुळशीची माळ पाहून हल्लेखोरांनी त्याला हिंदू समजून बेदम मारहाण केली आणि त्याची गाडीही फोडली. ज्या भागात हा हल्ला झाला त्या भागाला स्थानिक लोक 'मिनी पाकिस्तान' म्हणतात. सध्या सर्व आरोपी जामिनावर बाहेर आले आहेत. दि. ६ मे २०२४ ला ही घटना घडली.
 
मीडिया रिपोर्ट्सनुसार ही घटना तालापारा भागात घडली. ३० वर्षांचा जीवनदीप बिलासपूरमध्ये ट्रॅव्हल एजंट म्हणून काम करतो. दि. ६ मे रोजी त्यांच्या मुलीचा वाढदिवस होता. या वाढदिवसाला त्याने त्याच्या सर्व मित्रांनाही आमंत्रित केले होते, ज्यामध्ये आरिफ नावाचा एक व्यक्ती होता. आरिफ हा बिलासपूरच्या मुस्लीमबहुल तालपार भागातील रहिवासी आहे, ज्याला स्थानिक लोक 'मिनी पाकिस्तान' म्हणतात.
 
जीवनदीप रात्री आरिफच्या घरी सोडण्यासाठी गेला होता. परतत असताना जीवनदीपने गाडी सुरू केली असता तेथे उभ्या असलेल्या काही लोकांनी हेडलाइटचा प्रकाश डोळ्यात पडत असल्याचे सांगत भांडण करण्यास सुरुवात केली. सज्जाद अली, साबीर, मोहम्मद फैजान आणि शोएब खान यांनी जीवनदीपला शिवीगाळ करण्यास सुरुवात केली, असा आरोप आहे. जीवनदीपने विरोध केला असता त्याला गाडीतून बाहेर काढण्यात आले.
 
पीडितेच्या गळ्यात तुळशीची माळ पाहून हल्लेखोरांनी त्याला हिंदू म्हणत बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली. लाथा-बुक्क्यांसोबतच जीवनदीपवर लाठ्या-काठ्यांचाही वार करण्यात आला. त्यांच्या गाडीचीही तोडफोड करण्यात आली. कसेबसे जीवनदीपने त्याचा जीव वाचवला. यानंतर त्यांनी पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार दाखल केली. पोलिसांनी या सर्व आरोपींविरुद्ध आयपीसी कलम ३२३, ४२७, २९४, ३४ आणि ५०६ अंतर्गत एफआयआर नोंदवला.