प्रभादेवीचे संघ स्वयंसेवक कुमार सालियन यांचे निधन

    16-May-2024
Total Views |

Kumar Salian
(Kumar Salian RSS)

मुंबई (प्रतिनिधी) : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रभादेवी नगर कार्यवाह कुमार सालियन (५८) यांचे गुरुवार, दि. १६ मे रोजी निधन झाले. मीरा रोड येथील रुग्णालयात पहाटे ३ वा. त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मधुमेहाच्या आजाराशी त्यांची झुंज सुरु होती. मँगलोर येथे त्यांच्या गावी त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत. त्यांच्या पश्च्यात त्यांची पत्नी आणि मुलगी असा त्यांचा परिवार आहे. कुमार सालियन यांचा स्वतःचा हॉटेल व्यवसाय होता. त्यामुळे संघाच्या अनेक वर्गामध्ये त्यांनी भोजन व्यवस्था सांभाळली होती. गेली ४० वर्ष ते संघाशी परिचित होते. संघांचे काम तन मन धन पूर्वक करणारा कार्यकर्ता म्हणून त्यांची विशेष ओळख होती.