सरकारने विंडफॉल करात मोठी कपात केली काय आहे विंडफॉल कर जाणून घ्या…

८४०० रुपये प्रति टनवरून कमी करत हा कर ५७०० रुपये प्रति टन केला

    16-May-2024
Total Views |

Windfall Tax
 
मुंबई: सरकारने आज विंडफॉल करात (Windfall Tax) कपात केली आहे. सरकारने या करात ८४०० रुपये प्रति टनवरून कमी करत हा कर ५७०० रुपये प्रति टन केला आहे. या कर कपातीमुळे पेट्रोललियम अथवा कच्च्या तेलाचे उत्पादन करणाऱ्या कंपन्यांना यांचा मोठा दिलासा मिळणार आहे. हा विंडफॉल कर Special Additional Excise Duty (SAED) या स्वरूपात आकारला जातो. १६ मे पासून हे नवे दर लागू होणार आहेत.
 
जुलै १, २०२२ या पहिल्यांदा हे कर सरकारने कच्च्या तेलाच्या कंपन्यांवर लागू केले होते. तेलाच्या आठवडाभरातील सरासरी किंमती पाहता यांचे अवलोकन सरकार करत असते. रोजच्या किंमती पाहता सरकारने हा मोठा निर्णय घेतला आहे.
 
विंडफॉल कर म्हणजे काय?
 
हा एक विशेष कर आहे. एखाद्या विशेष परिस्थितीत आंतरराष्ट्रीय स्तरावर कच्च्या तेलाच्या कंपन्यांना विशेष फायदा होतो. मागणी पुरवठा गणित पाहता मागणीत वाढ व पुरवठयात घट झाल्यावर बाजारात तेल कंपन्या मोठा नफा कमावतात. त्यामुळे हा अनैसर्गिक नफा झाल्यावर त्यावर सरकार कराचा अधिकचा अधिभार या कंपन्यांवर लावते. विशिष्ट परिस्थितीत कमावलेल्या नफ्यातून कर वसूल करत हा पैसा लोककल्याणकारी योजना वापरण्यासाठी या निधीचा वापर होतो. पारंपारिक करापेक्षा हा कर अधिक रकमेत असतो.