खुष खबर ! स्टेट बँक ऑफ इंडियाने मुदतठेवीवर व्याजदर वाढवले

२ कोटींच्या आत असलेल्या मुदत ठेवीवर २५ -७५ बेसिस पूर्णांकाने दर वाढवला

    16-May-2024
Total Views |

SBI
 
 
मुंबई: देशातील सर्वात मोठी बँक स्टेट बँक ऑफ इंडियाने आपल्या किरकोळ मुदत ठेवीवरील व्याजदरात वाढ झाली आहे. २ कोटींच्या आत असलेल्या मुदत ठेवीवर २५ -७५ बेसिस पूर्णांकाने दर वाढवलेला आहे. १ वर्षाच्या आत असलेल्या मुदत ठेवीवर हे व्याज मिळणार असल्याचे बँकेने म्हटले आहे.
 
याशिवाय २ कोटी व त्याहून अधिक मुदतठेवीवर १० ते ५० बेसिस पूर्णांकाने व्याजदरात वाढ करण्यात आली आहे. बँकेने आपल्या कर्ज देण्याच्या दृष्टीने मुदतठेवीत वाढ करण्यासाठी हा धोरणात्मक निर्णय घेतला आहे. १५ मे २०२४ पासून हे नवे व्याजदर लागू होतील.
 
किरकोळ ४६ ते १७९ दिवसांच्या मुदतठेवीवर बँकेने ४.७५ ते ५.५० टक्के व्याजदर (७५ बेसिस पूर्णांकाने)देण्याचे ठरवले आहे.१८० ते २१० दिवसांच्या मुदतठेवीवर ५.७५ ते ६ टक्क्यांपर्यंत (२५ बीपीएस पूर्णांकाने) व २११ ते १ वर्षाच्या आत असलेल्या मुदतठेवीवर ६ ते ६.२५ टक्क्यांवर (२५ बीपीएस पूर्णांकाने) व्याजदर ग्राहकांना मिळणार आहे.
 
बँकेच्या २ ते ३ वर्ष मुदतठेवीवर ७ टक्क्यांपर्यंत व्याज मिळू शकते. घरगुती घाऊक मुदतठेवीसाठी बँकेने व्याजदरात वाढ केली आहे.७ ते ४५ दिवसांच्या मुदतठेवीसाठी ५ ते ५.२५ टक्क्यांनी व्याज मिळणार आहे तर ४६ ते १७९ दिवसांच्या मुदतठेवीसाठी ५.७५ ते ६.२५ टक्के व्याजदर मिळणार आहे तर १८० ते २१० दिवसांसाठी ६.५० ते ६.६० टक्क्यांवर व्याज मिळू शकते.
 
एक वर्षाच्या पेक्षा जास्त व्याजदर ६.८० ते ७ टक्क्यांवर वाढ झाली आहे. तर १ ते २ वर्षाच्या मुदतठेवीसाठी ६.८० ते ७ टक्क्यांवर वाढ झाली आहे. २ ते ३ वर्षाच्या मुदतठेवीसाठी ६.७५ ते ७ टक्क्यांवर वाढ झाली आहे.