अमेरिकन महागाई आकडेवारी जाहीर झाल्यानंतर सोन्याचे भाव 'इतक्याने' उसळले चांदीही महाग

अमेरिकन बाजारातील महागाई दर नियंत्रणात आल्याने बाजारात वाढ

    16-May-2024
Total Views |

Gold
 
 
मुंबई: अमेरिकन बाजारातील महागाई आकडे आल्यानंतर सोन्याच्या भावात मोठी वाढ झाली आहे. सोन्याच्या जागतिक निर्देशांकात वाढ झाल्याने आशियाई बाजारात सोन्याच्या दरात वाढ झाली आहे.युएस गोल्ड फ्युचर निर्देशांकात १२.१५ वाजेपर्यंत ०.२० टक्यांने वाढ झाल्याने बाजारात वाढ झाली आहे. भारतातील एमसीएक्स (MCX) निर्देशांकात ०.०४ टक्क्यांनी वाढ होत सोने ७३१२९.०० पातळीवर पोहोचले आहे.
 
अमेरिकन बाजारात युएस इन्फेक्शन (महागाई दरात ) घट होत दर ३.४ टक्क्यांवर आल्याने बाजारात सोन्याच्या वाढ सुरू झाली आहे. यामध्ये युएस फेडरल रिझर्व्ह व्याजदरात कपात होईल का याची अपेक्षा वाढल्याने पुन्हा बाजारात सोन्याच्या भाव वधारला आहे.
 
भारतीय सराफा बाजारात २२ कॅरेट सोन्याच्या दरात प्रति १० ग्रॅम ७०० रुपयांनी वाढ होत सोने ७४०२० रुपयांवर तर २४ कॅरेट सोन्याच्या दरात प्रति १० ग्रॅम दरात ७७० रुपयांनी वाढ झाल्याने बाजार ७४०२० रुपयांवर पोहोचले आहे. मुंबईतील सोन्याच्या दरात प्रति १० ग्रॅम ७०० ते ७७० रुपयांनी वाढ होत सोने ७४०२० रुपयांवर पोहोचले आहे.
 
चांदीच्या दरात वाढ
 
चांदीच्या १ किलो दरात १५०० रुपयांनी वाढ होत ८९१०० रुपयांवर चांदी पोहोचली आहे. एमसीएक्सवर चांदीच्या निर्देशांकात ०.१९ टक्क्यांनी वाढत ८७०२७.०० पातळीवर पोहोचले आहे.
 
आजच्या सोन्याच्या पातळीवर प्रतिक्रिया देताना कोटक सिक्युरिटीज रिसर्चचे ज्येष्ठ व्यवस्थापक कन्यात चैनवाला म्हणाले, 'COMEX सोन्याच्या किमती बुधवारी १ % पेक्षा जास्त वाढल्या आणि एप्रिल २०२४ मध्ये $२४४८.८ प्रति ट्रॉय औंस या सार्वकालिक उच्चांकाच्या तुलनेत केवळ २% लाजाळू आहेत. कमकुवत डॉलर आणि कमी यूएस बेंचमार्क ट्रेझरी उत्पन्नामुळे पिवळा धातू वाढला. फेडरल रिझर्व्हद्वारे व्याजदर कपातीची अपेक्षा मजबूत करत महागाईचा आकडा थंडावल्याचे संकेत दिले.
 
यूएस हेडलाइन CPI ०.३ % m/m पर्यंत मंदावली, अपेक्षित ०.४% पेक्षा कमी, तर y/y संख्या ३.४% आणि कोर महागाई अंदाजानुसार ३.६% पर्यंत कमी झाली. यानंतर शिकागो फेड बँकेचे अध्यक्ष ऑस्टन गुल्सबी यांनी महागाई कमी होत राहील असा आशावाद व्यक्त केला. गुंतवणूकदार आता साप्ताहिक बेरोजगार दाव्यांच्या डेटाची आणि आज नंतर फिलाडेल्फिया फेड मॅन्युफॅक्चरिंग इंडेक्सकडे पहात आहेत.'