हे तुम्हाला माहितीये का? एका मृत्युमुळे केरळच्या २६४८ मंदिरांमध्ये 'या' फुलावर बंदी आणली आहे
16 May 2024 16:49:20
मुंबई (प्रतिनिधी) : (Death by flower) केरळमधील दोन मंदिर ट्रस्टनी मिळून येथील २६४८ मंदिरांमध्ये ऑलियंडरची फुले न वापरण्याबाबत मोठा निर्णय घेतला आहे. कारण या फुलामुले २४ वर्षीय एका नर्सचा मृत्यू झाल्याचे निदर्शनास आले होते. त्रावणकोर देवस्वोम बोर्ड आणि मलबार देवस्वोम बोर्ड या दोन बोर्डांनी मिळून हा निर्णय घेतला आहे.
इंडियन एक्स्प्रेसच्या वृत्तानुसार, सूर्या सुरेंद्रन या नर्सचा केरळमधील अलापुझा येथे काही दिवसांपूर्वी संशयास्पद मृत्यू झाला होता. प्राथमिक तपासात ओलिंडरच्या विषबाधेमुळे मृत्यू झाल्याचे समोर आले. ऑलिंडरच्या रोपाची पाने विषारी असतात, हे माहित नसल्याने सूर्या सुरेंद्रन यांच्याकडून ती चुकून चघळली गेली. त्यानंतर त्यांना श्वास घेण्यास त्रास होऊ लागला आणि उलट्या होऊ लागल्या. रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.