होर्डिंग दुर्घटनेतील मुख्य आरोपी भावेश भिंडेला राजस्थानमधून अटक!

    16-May-2024
Total Views |
Bhavesh Bhinde arrested
 
मुंबई : घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील मुख्य आरोपी भावेश भिंडेला अखेर मुंबई पोलिसांनी गुरुवार, दि. 16 मे रोजी अटक केली आहे. राजस्थानच्या जयपूरमधून भावेशच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आले आहे. भावेश भिंडेच्या मागावर मुंबई पोलिसांची सात पथके कार्यरत होती. वेगवेगळ्या भागात भिंडेचा पोलिसांकडून शोध सुरू होता. तो राज्याबाहेर पळाल्याचा संशय पोलिसांना होता. यापूर्वी भिंडेचे शेवटचे लोकेशन लोणावळ्यात आढळले होते.

मान्सूनपूर्व पावसामुळे सोमवार, दि. 13 मे रोजी घाटकोपरमधील छेडा नगरात जाहिरात फलक (होर्डिंग) कोसळले होते. या दुर्घटनेत आतापर्यंत एकूण 16 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या होर्डिंगचा मालक भावेश भिंडे हा गेल्या तीन दिवसांपासून फरार होता. या दुर्घटनेप्रकरणी पंतनगर पोलीस ठाण्यात आरोपी भावेश भिंडे आणि जाहिरात कंपनीविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.