रेल्वेचे खासगीकरण होणार नाही; केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची स्पष्टोक्ती

    16-May-2024
Total Views |
 
Ashwini Vaishnav
 
मुंबई : रेल्वेचे खासगीकरण होणार नाही अशी स्पष्टोक्ती केंद्रीय रेल्वेमंत्री व माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी बोलताना दिली आहे. रेल्वे ही कंपनी नसून रेल्वे हा सरकारी विभाग आहे असे वैष्णव म्हणाले आहेत. 'विकसित भारत २०४७' या कार्यक्रमात संवाद साधताना त्यांनी हे वक्तव्य केले. या कार्यक्रमाला ईशान्य पूर्व मुंबईचे विद्यमान खासदार मनोज कोटक, उत्तर पूर्व मुंबईचे भाजपचे उमेदवार मिहीर कोटेचा, घाटकोपर पूर्वचे आमदार पराग शहा व इतर अनेक मान्यवर उपस्थित होते. पंतप्रधान नरेंद्र मोदींचे विकसित भारताचे स्वप्न कसे सत्यात उतरत आहे याबद्दलची माहिती देण्यासाठी अश्विनी वैष्णव यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.
 
"गेल्या १० वर्षात काँग्रेसने भारताची १० वर्षे वाया घालवली. गेल्या दहा वर्षांत मोदी सरकारने अनेक मोठी स्वप्न सत्यात साकारण्यासाठी खूप मेहनत घेतली. वंदे भारत या जागतिक दर्जाच्या सुविधा असलेली रेल्वे हे याचं उदाहरण आहे. यावेळी रेल्वेत घडणारे परिवर्तन आणि वेगवान पायाभूत सुविधा बांधणी कशाप्रकारे झाली," याबद्दल वैष्णव यांनी भाष्य केले. तसेच काँग्रेसचे निष्कामी शासन असताना बीएसएनएल, एमटीएनएलचे नुकसान झाल्याचेही ते म्हणाले.
 
हे वाचलंत का? -  आता बोरीवली हेच माझं पहिलं घर : पीयूष गोयल
 
"भारताची अर्थव्यवस्था, रेल्वेचे व्हिजन व तंत्रज्ञान प्रणित टेलिकॉम क्षेत्रातील प्रगती समजावून सांगताना त्यांनी श्रोत्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांचे रेल्वेविषयी अभिप्राय, सूचना, अथवा अनुभव या विषयावर अधिक भर दिला. हे सगळे प्रश्न सोडवत असतानाच पुन्हा वेगवान प्रगतीसाठी भाजपला बहुमताने निवडून द्या," असे आवाहनही वैष्णव यांनी केले.
 
"मोदींच्या कार्यकाळात भारत महासत्ता होत असतानाच पुन्हा तिसऱ्या क्रमांकावर अर्थव्यवस्था नेण्याचा आपल्या सरकारचा मानस आहे. रेल्वेबाबत बोलताना जागतिक दर्जाच्या रेल्वेसाठी आम्ही कटिबद्ध आहोत," असे वैष्णव म्हणाले आहेत. अखेरीस देशाचे भवितव्य घडवण्यासाठी मोठ्या संख्येने मतदान करा, असे आवाहन त्यांनी केले आहे.