सर्वसमावेशक आरोग्य संरक्षण आणि आरोग्य विमा

    16-May-2024
Total Views |
health coverage and health insurance
  
सर्वसमावेशक आरोग्य संरक्षण या उद्दिष्टाच्या दिशेने जाण्यासाठी आरोग्यसेवेची उपलब्धता महत्त्वाची ठरते. याचा अर्थ असा की, प्रत्येकाला अत्यावश्यक आरोग्यसेवा त्यासाठी पैसे न मोजता मिळाली पाहिजे आणि ‘आरोग्य विमा’ या संकल्पनेच्या केंद्रस्थानी आहे. कारण, आरोग्य विम्यामुळे हे उद्दिष्ट वास्तवात आणण्यास मदत होते.

सर्वसमावेशक आरोग्य संरक्षणामध्ये तपासण्या, उपचार, मानसिक आरोग्यविषयक साहाय्य आणि डॉक्टरांनी दिलेली औषधे आदी निरोगी राहण्यासाठी आवश्यक अशा अनेकविध सेवांचा समावेश होतो. हे केवळ शारीरिक आरोग्यासाठी नसते, तर मानसिक व भावनिक स्वास्थ्यासाठी असते. लोकांच्या आयुष्याचा दर्जा सुधारण्यासाठी असते.आरोग्य विमा महत्त्वाचा आहे. कारण, तो आर्थिक सुरक्षितता प्रदान करतो आणि आरोग्य सेवेवरील खर्च कमी करतो. हा खर्च अनेक लोकांमध्ये वाटून मोठाली बिले न भरता वैद्यकीय मदत मिळवण्यात विमा फायदेशीर ठरतो. विम्याचे कवच घेतलेल्यांना प्रतिबंधात्मक उपचार मिळण्याची शक्यता जास्त असते, त्यांच्या आरोग्याच्या समस्यांचे निदान लवकर होते व दीर्घकालीन आरोग्य सुधारते, असे अभ्यासांतून दिसून आले आहे.
 
तरीही अनेकांना पुरेसा आरोग्य विमा मिळण्यासाठी अनेक आव्हानांना तोंड द्यावे लागते. चढे खर्च, मर्यादित निवड आणि जटील कागदपत्रांमुळे लोकांना विमा घेण्यात अडचणी येतात. विशेषत: हातात फारसा पैसा नसलेल्या लोकांसाठी संरक्षण प्राप्त करणे अधिक कठीण होते. या समस्या सोडवण्यासाठी तसेच विमा अधिक उपलब्ध व परवडण्याजोगा करण्यासाठी नवनवीन कल्पना व धोरणांची गरज आहे.त्यासाठीचा एक महत्त्वाचा मार्ग म्हणजे तंत्रज्ञानाचा वापर. डिजिटल साधनांमुळे विम्याची प्रक्रिया सुलभ होऊ शकते. लोकांना ‘साईन अप’ करणे आणि त्याचे पर्याय समजून घेणे त्यामुळे सोपे होते. अ‍ॅप्स आणि ऑनलाईन प्रणालींद्वारे व्यक्तीनुरूप सल्ला मिळू शकतो. विमा अधिक प्रमाणात उपलब्ध होऊ शकतो आणि लोकांना आरोग्यसेवेविषयी अधिक चांगले पर्याय निवडण्यात मदत होते.
 
टेलीमेडिसिन आणि डिजिटल हेल्थ प्लॅटफॉर्म्स यांसारख्या नवीन तंत्रज्ञानामुळे विमा खरेदी करण्याच्या पद्धतीत बदल होत असल्याचे दिसून येते. या साधनांद्वारे दूरस्थपणे अपॉइंटमेंट्स दिल्या जातात आणि विमा कंपन्या व सदस्य यांच्यात अधिक चांगला संवाद होऊ शकतो. डेटा आणि तंत्रज्ञानाचा वापर करून विमाकंपन्या, वेगवेगळ्या समूहांच्या गरजांची पूर्तता करू शकतील, अशा योजना देऊ करण्यात तसेच आजच्या डिजिटल जगात विम्याचे महत्त्व व उपयुक्तता कायम राखण्यात मदत करू शकतात.एकंदर सर्वसमावेशक आरोग्य संरक्षणासाठी आरोग्य विमा निर्णायक आहे. आर्थिक संरक्षणाची निश्चिती करण्यासाठी तसेच आवश्यक आरोग्यसेवा पुरवण्यासाठी देखील आरोग्य विमा उपयुक्त आहे. अडथळे दूर करून, तंत्रज्ञानाचा वापर करून आणि समावेशक धोरणे निर्माण करून, प्रत्येकाला निरोगी व आनंदी आयुष्य जगण्यासाठी आवश्यक ती आरोग्य सेवा मिळवून देणार्‍या भविष्यकाळाकडे आपण जाऊ शकतो. शिवाय समाजाच्या स्वास्थ्यासाठी ही योग्य गुंतवणूक आहे.
 
 
अनुपमा रैना


(लेखिका एसबीआय जनरल इन्शुरन्सच्या हेल्थ बिझनेसच्या प्रमुख आहेत.)