‘झाड’ चित्रपटातून मिळणार निसर्ग संवर्धनाचा कानमंत्र

    15-May-2024
Total Views |
‘झाड’ चित्रपट २१ जून रोजी हा चित्रपट महाराष्ट्रात सर्वत्र प्रदर्शित
 
 

zaad  
 
मुंबई : वाढतं तापमान, काँक्रिटीकरण, घटती वनराई यामुळे पर्यावरणाचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत आहे. अशातच वनसंपदेच्या जपणुकीचा मुद्दा आता चित्रपटातून मोठ्या पडद्यावर येत आहे. झाड या चित्रपटात झाडांचं महत्त्व अधोरेखित करण्यात आलं असून, २१ जून रोजी हा चित्रपट महाराष्ट्रात सर्वत्र प्रदर्शित होत आहे.
 
झाड वाचवण्यासाठी, झाड लावण्यासाठी आणि झाड जगवण्यासाठी केलेला संघर्ष, पर्यावरण संवर्धनाचा या देशाला दिलेला कानमंत्र असं या चित्रपटाचं आशयसूत्र आहे. आजवर चित्रपटांतून सामाजिक विषय हाताळले गेले असले, तरी पर्यावरण संवर्धन, झाडांचं जतन-संगोपन हा विषय चित्रपटातून मांडला गेल्याचं फारसं पाहायला मिळालेलं नाही. त्यामुळे आजच्या ज्वलंत आणि अत्यंत महत्त्वाच्या विषयाची मांडणी "झाड" या चित्रपटातून कशी करण्यात आली आहे, याबाबत नक्कीच उत्सुकता निर्माण झाली आहे.
 
योगेश लिलाधर राजपूत यांनी प्रस्तुती केलेल्या "झाड" या चित्रपटाची निर्मिती द ग्रीन इंडिया फिल्म्स यांनी केली आहे. सचिन बन्सीधर डोईफोडे या चित्रपटाचे निर्माता आहेत. चित्रपटाचं लेखन आणि दिग्दर्शन सचिन बन्सीधर डोईफोडे यांनीच केलं आहे. चित्रपटात डॉ. दिलीप डोईफोडे, प्रकाश धोत्रे, संदीप वायबसे, शिवलिंगआप्पा बेंबळकर, कैलास मुंडे, प्रल्हाद उजागरे, प्रशांत मुरकुटे, संजीवकुमार मेसवाल, जोशना नेहरकर, दुर्वास चौरे, दत्तात्रय मुंडे, देवई डोईफोडे, मच्छिंद्र डोईफोडे, प्रियंका नेहरकर, ओमकार डोईफोडे, करण डोईफोडे, माऊली सानप, काजल डोईफोडे, पंकजा वायबसे, जान्हवी कदम, राजवी डोईफोडे, आर्यन हजारे अशी स्टारकास्ट आहे.