शेअर बाजार अपडेट: सकाळी ११ पर्यंत बाजारात वाढ ! सकाळच्या सत्रात सेन्सेक्स ७३१२०.४६ व निफ्टी २२२४४.५० पातळीवर

बँक निर्देशांकात घसरण मात्र पीएसयु बँकेत वाढ !

    15-May-2024
Total Views |

Stock Market
 
मुंबई: आज सकाळी ११ वाजेपर्यंत इक्विटी बेंचमार्क निर्देशांकात वाढ झाली आहे. ओसरती पडझड झाल्यानंतर आता पुन्हा बाजारात चढ सुरू झाल्याने बाजारात वाढ झाली आहे. सकाळच्या सत्रात ११ वाजेपर्यंत सेन्सेक्स निर्देशांक १५.८५ अंशाने वाढत ७३१२०.४६ पातळीवर पोहोचला आहे तर निफ्टी ५० निर्देशांक २६.६५ अंशाने वाढत २२२४४.५० पातळीवर पोहोचला आहे.मात्र दोन्ही बँक निर्देशांकातही घसरण कायम राहिली आहे.
 
एस अँड पी सेन्सेक्स बँक निर्देशांकात ७७.७१ अंशाने घट होत ५४४८६.०२ पातळीवर निर्देशांक पोहोचला आहे तर निफ्टी बँक निर्देशांक १०४.८५ अंशाने घसरण होत ४७७५४.६० पातळीवर पोहोचला आहे. बीएसई मिडकॅप व स्मॉलकॅपमध्ये अनुक्रमे ०.६९ व ०.९२ टक्क्यांनी वाढ झाली आहे तर एनएसईत मिडकॅप व स्मॉलकॅपमध्ये अनुक्रमे ०.६१ व ०.६२ टक्क्यांनी वाढ झाली आहे. बाजारातील मिडकॅप व स्मॉलकॅपमध्ये वाढ झाल्याने बाजारात आश्वासक वातावरण पहायला मिळेल याचा फैसला शेवटच्या सत्रात होणार असला तरी बाजारात आज मिड कॅप व स्मॉलकॅपमध्ये होणारी हालचाल पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
 
एनएसईतील क्षेत्रीय निर्देशांकात (Sectoral Indices) मध्ये संमिश्र प्रतिसाद कायम राहिला आहे. बँक ऑटो, फायनांशियल सर्विसेस, एफएमसीजी, आयटी समभागात घसरण झाली असून सर्वाधिक वाढ पीएसयु बँक, रिअल्टी समभागात वाढ झाली आहे.
 
आज बीएसईत सकाळच्या सत्रात एनटीपीसी, पॉवर ग्रीड, एम अँड एम, एचसीएलटेक, टाटा स्टील, भारती एअरटेल,एसबीआय, विप्रो, रिलायन्स, लार्सन, कोटक महिंद्रा, बजाज फिनसर्व्ह, एक्सिस बँक या समभागात वाढ झाली असून सनफार्मा, एचडीएफसी बँक, जेएसडब्लू स्टील, टाटा मोटर्स, मारूती सुझुकी, एचयुएल, अल्ट्राटेक सिमेंट, टायटन कंपनी, आयसीआयसीआय बँक, टीसीएस, नेस्ले, बजाज फायनान्स, इंडसइंड बँक या समभागात घसरण झाली आहे.
 
एनएसईत सिप्ला, कोल इंडिया, अदानी एंटरप्राईज, एनटीपीसी, डॉ रेड्डीज, हिंदाल्को, पॉवर ग्रीड, एम अँड एम, अदानी पोर्टस, बीपीसीएल, एचसीएलटेक, टाटा स्टील, ओएनजीसी, एसबीआय लाईफ इन्शुरन्स, विप्रो, हिरो मोटोकॉर्प, भारती एअरटेल, ग्रासीम, आयटीसी, श्रीराम फायनान्स, लार्सन, कोटक महिंद्रा, बजाज फिनसर्व्ह या समभागात वाढ झाली असून सनफार्मा, ब्रिटानिया, बजाज ऑटो, आयशर मोटर्स, जेएसडब्लू स्टील, टाटा मोटर्स, टाटा कनज्यूमर प्रोडक्ट, एचयुएल, एचडीएफसी लाईफ, मारूती सुझुकी, नेस्ले, आयसीआयसीआय बँक, टीसीएस, इंडसइंड बँक, बजाज फायनान्स, एक्सिस बँक, टेक महिंद्रा या समभागात घसरण झाली आहे.