Q4 Results: भारती एअरटेलचा तिमाही निकाल, निव्वळ नफा ११ टक्क्यांनी घटत २०६८.२ कोटी, कंपनीने ८ रुपये लाभांश जाहीर केला

इयर ऑन इयर बेसिसवर महसूलात ७.८ टक्क्यांनी वाढ

    15-May-2024
Total Views |

Airtel
 
 
मुंबई: भारती एअरटेल कंपनीने आपल्या चौथ्या तिमाहीचा निकाल जाहीर केला आहे. मागील वर्षाच्या तुलनेत कंपनीच्या कामकाजातून मिळणाऱ्या महसूलात (Revenue From Operations) मध्ये ४.४ टक्क्यांनी वाढ झाली आहे. मागील वर्षी कंपनीचा हा महसूल ३६००९ कोटी होता जो वाढत ३७५९९.१ कोटी प्राप्त झाला आहे. कंपनीच्या निव्वळ नफ्यात ३१ टक्क्यांनी घट झाली आहे. मागील वर्षी कंपनीला ३००५.६ कोटींचा नफा झाला होता तो घटत यंदा २०६८.२ कोटी मिळाला आहे.
 
कंपनीच्या एकूण महसूलात इयर ऑन इयर बेसिसवर (YoY) ७.८ टक्क्यांनी वाढत १४९९८२ कोटीवर गेले आहे. कंपनीचा ईबीआयटीडीए (EBITDA) मार्जिन ११५ बीपीएसने वाढत ५२.७ टक्क्यांवर पोहोचले आहे. कंपनीचा ईबीआयटीडीए ५९००९ कोटींवर पोहोचले आहे. कंपनींच्या एकूण उत्पन्न ११३०५ कोटींवर पोहोचले आहे. इतर खर्च वगळून कंपनीचे उत्पन्न ७४६७ कोटींवर पोहोचले आहे.
 
आर्थिक वर्ष २०२३-२४ मध्ये कंपनीने १०५१६ कोटींची भांडवली गुंतवणूक (Capex) केली होती. कंपनीच्या कर व इतर खर्च पूर्व नफा १९५९० कोटींवर पोहोचला आहे. कंपनीचे ARPU (एव्हरेज रेविन्यू पर युजर) मागच्या वर्षी २०७ रुपये प्रति युजरवरून वाढत २०८ रुपयांवर पोहोचले आहे.
 
भारती एअरटेलने एकूण यावर्षी ८ रुपयांचा लाभांश (Dividend) प्रति समभाग जाहीर केला आहे.