“त्या बातम्यांचा त्याला खूप त्रास व्हायचा”, मनोज बाजपेयींनी सुशांतच्या आठवणींना दिला उजाळा

    15-May-2024
Total Views |

sushant  
 
 
मुंबई : हिंदी चित्रपटसृष्टीतील हरहुन्नरी अभिनेता सुशात सिंग राजपूतच्या मृत्यूनंतर आजही त्याची आठवण येत नसल्याचा एकही दिवस जात नाही. नुकतीच या अभिनेत्याची आठवण मनोज बाजपेयी यांनी चित्रपटाच्या निमित्ताने शेअर केली आहे. मनोज बाजपेयी सध्या त्यांच्या ‘भैय्याजी’ चित्रपटामुळे चर्चेत आहेत. यावेळी एका मुलाखतीमध्ये मनोज यांनी दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आठवणींना उजाळा दिला. मनोज बाजपेयी आणि सुशांत सिंह राजपूतने अभिषेक चौबे दिग्दर्शित ‘सोनचिडिया’ चित्रपटात काम केलं होतं.
 
सिद्धार्थ कन्ननला दिलेल्या मुलाखतीत मनोज बाजपेयी म्हणाले की “तथ्य नसलेल्या बातम्यांमुळे सुशांत सिंह राजपूतला देखील खूप त्रास व्हायचा?” यावर मनोज बाजपेयी म्हणाले, “हो त्याला खूप जास्त त्रास होतं होता. याबाबतीत तो खूपच असुरक्षित होता. तो खूप चांगला माणूस होता. चांगल्या माणसावरच परिणाम होतं असतो. तो अनेकदा माझ्याकडे येऊन विचारायचा, सर मी काय करू? तर मी त्याला म्हणायचो की, तू जास्त मनावर घेऊ नकोस आणि चिंता करू नकोस. कारण मी अनुभवलं आहे, अजून अनुभवतो आहे.”
 
पुढे ते म्हणाले की, “काही लोकं आहेत, ज्यांचे चित्रपट चालत आहेत, जे पॉवरमध्ये आहेत, त्यांना हाताळण अवघड आहे. पण मी वेगळ्या पद्धतीने हाताळत आहे. मी जेव्हा माझी पद्धत सुशांतला सांगितली तेव्हा तो खूप हसला होता. म्हणायचा, सर हे तुम्हीच करू शकता मी करू शकत नाही. मी कसं करू? तथ्य नसलेल्या बातम्यांमुळे त्याला खरंच भयंकर त्रास व्हायचा. तो खूपच संवेदनशील आणि हुशार माणूस होता. मी सेटवर जे मटण बनवायचो, त्याला ते खूप आवडायचं. मी केलेलं मटण खाण्यासाठी तो वेडा होता. कारण आम्ही बिहारी आहोत. त्याच्या निधनाच्या १० दिवसाआधी माझं त्याच्याशी फोनवर बोलणं झालं होतं.”