"काशी आणि मथुरेत भव्य मंदिर बांधण्यासाठी ४०० जागा पाहिजेत" - हिमंता बिस्वा सरमा

    15-May-2024
Total Views |
 SARMA
 
नवी दिल्ली : "भाजपप्रणित एनडीएला लोकसभेत ४०० जागा पाहिजेत कारण अयोध्येनंतर आता काशी आणि मथुरेत भव्य मंदिर बांधायचे आहे." असे वक्तव्य आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी केले आहे. सरमा दिल्लीतील लक्ष्मी नगरमध्ये पूर्व दिल्ली लोकसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार हर्ष मल्होत्रा यांच्या निवडणुकीच्या रॅलीला संबोधित करत होते, तेव्हा त्यांनी भाजपप्रणित एनडीएला ४०० जागा का पाहिजेत? याचं उत्तर दिलं.
 
हिमंता बिस्वा सरमा म्हणाले की, "लोकसभा निवडणुकीत भाजप जेव्हा ४०० चा आकडा पार करेल तेव्हा मथुरेत कृष्णाच्या जन्मस्थानी भव्य मंदिर बांधले जाईल आणि काशीतील ज्ञानवापी मशिदीच्या जागी बाबा विश्वनाथांचे भव्य मंदिर बांधले जाईल. मुघलांनी केलेल्या कुरापती साफ करायच्या आहेत."
 
प्रचार सभेत बोलताना सरमा यांनी काश्मीरच्या मुद्द्यावर काँग्रेसवर निशाणा साधला. सरमा म्हणाले की, "काँग्रेसच्या काळात जम्मू-काश्मीरमध्येही पाकिस्तानचा ध्वज दिसत होता. आता पीओकेमध्येही लोक भारताचा झेंडा हातात धरलेले दिसतात." काँग्रेसच्या काळात काश्मीरवर संसदेत चर्चा होत नव्हती, असा आरोप देखील सरमा यांनी काँग्रेसवर केला.
 
हिमंता बिस्वा सरमा यांनी दिल्लीतील विकासावरून आम आदमी पक्षाला कोंडीत पकडले. हिमंता म्हणाले, “आधी जेव्हा आम्ही दिल्लीत आलो तेव्हा आम्हाला लाल किल्ला आणि कुतुबमिनार पाहण्यास सांगितले होते आणि आता आम्हाला मोहल्ला क्लिनिक पाहण्यास सांगितले जाते, परंतु आज जेव्हा मी मोहल्ला क्लिनिक पाहण्यासाठी गेलो तेव्हा मला आश्चर्य वाटले की जर दिल्लीची ओळख आहे. आसाममधील प्रत्येक जिल्ह्यात वैद्यकीय महाविद्यालये बांधली जात असून दिल्लीत भाजपचे सरकार आल्यावर मोहल्ला क्लिनिकऐवजी येथे सुपर स्पेशालिस्ट रुग्णालये आणि वैद्यकीय महाविद्यालये बांधली जातील." असे आश्वासन त्यांनी मतददारांना दिले.